आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • One Day Before Marriage The Bride Lodged A Case Of Rape Dowry The Bride Herself Set Fire

लग्नाच्या एक दिवस आधीच वधूने होणाऱ्या नवऱ्यावर टाकला बलात्कार आणि हुंड्याबळीचा खटला, नवदेवाने स्वतःला पेटवून घेतले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नीमराना - येथे शनिवारी संध्याकाळी आरोपी नवरदेवाने पोलिस स्टेशनसमोर स्वतःवर रॉकेल आग लावल्याची घटना घडली. तशाच अवस्थेत तो पोलिस स्टेशन परिसराच्या बाहेर येऊन पडला. कुटुंबीयांनी त्याच्यावर माती टाकून त्याला वाचवले आणि रुग्णालयात दाखल केले. आमच्या मुलीवर अत्याचार करून अश्लील व्हिडिओ बनवणे आणि हुंड्यात ब्रेझा कारची मागणी केल्याप्रकरणी वधू पक्षाने नवरदेवावर गुन्हा दाखल केला होता. यामुळे नवरदेवाने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलवर येथील सोमवंशी कॉलनीतील रहिवासी एका महिलेने आपल्या मुलीचा विवाह फतेहपुरा येथील अजय सोबत ठरवले होते. रविवारी दोघांचे लग्न होणार होते. पण शुक्रवारीच मुलीची आई व नातेवाईक वरात घेऊन फतेहपुरा गावात आले होते. पण नवरदेव अजयचे वडील महेंद्र तसेच त्याचा मेहूणा जितेंद्र यांनी हुंड्यातील केलेली ब्रेझा कारची मागणी पूर्ण न केल्याने वरात परत पाठवली. 

 

दरम्यान वधूच्या आईने नीमराना पोलिस स्टेशनमध्ये अजय, पिता महेंद्र तसेच आई आणि बहीण-मेहूण्याविरोधात हुंड्याची मागणी आणि अजय विरोधात मुलीसोबत अत्याचार व अश्लील व्हिडिओ करून ब्लॅकमेल केल्याची तक्रार दाखल केली. तक्रारीत म्हटले आहे की, अजयने फेसबुक व व्हाट्सअॅपद्वारे तिच्या मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. दबाव टाकून हे नाते ठरवले. यानंतर तिला फूस लावून फतेहपुरा येथे नेले. तेथे चहात गुंगीचे औषध टाकून तिच्यावर बलात्कार केला. अश्लील फोटो काढले. यानंतर बहरोड येथील हॉटेलवर बोलावले आणि तेथे ब्लॅकमेल करत पुन्हा अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी केली आहे. 

 

रॉकेल घेऊन पोलिस ठाण्यात पोहोचला आरोपी
पीडितेची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पोलिसांनी वधूला नीमराना पोलिस ठाण्यात आणले. आरोपी अजय, त्याची आई, वडील महेंद्र आणि मेहूणा जितेंद्र यांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावले. यादरम्यान नवरदेव अजय आपल्यासोबत रॉकेलची कॅन आपल्यासोबत घेऊन आला होता. त्याने पोलिस ठाणे परिसरात स्वतःवर रॉकेल ओतून पेटवून घेतले. कुटुंबीयांनी आग विझवून त्याला रुग्णालयात दाखल केले.