आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरोड्यासाठी आले अन् मार खाऊन गेले, गावकऱ्यांच्या मारहाणीत एकाचा मृत्यू, तर 3 जणांनी पळून वाचवला जीव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हिडिओ डेस्क - झारखंडची राजधानी रांचीच्या एका गावात चोरांना बेदम मारण्यात आले. हली घटना नामकुमच्या हाहाप गावातील आहे. येथे 4 सशस्त्र दरोडेखोर एका घरात घुसले. त्यांनी या घरातील सदस्यांना धमकी देऊन मारहाण केली. ते चोरी करणार तेवढ्यात घरातील एका सदस्याने हिंमत करून आरडाओरड केली. त्याचा आवाज ऐकून शेजाऱ्यापाजाऱ्यांनी धाव घेतली. आता लोकांनीच चोरांना घेरलेले होते. सर्वांनी मिळून दरोडेखोरांना बेदम मारहाण सुरू केली. एक चोर या मारहाणीत मृत्युमुखी पडला. तर इतर तिघे जीव वाचवून पळून गेले. या घटनेत काही गावकऱ्यांनाही दुखापत झाली. जखमींवर उपचार सुरू आहेत. दुसरीकडे, घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...