आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालेगावातील एकाचा स्वाइन फ्लूने मृत्यू; यंदा आत्तापर्यंत १७ जणांचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- स्वाइन फ्लूमुळे मालेगाव तालुक्यातील सुरेश सोनू थाेरात (४२) यांचा बुधवारी (दि. १२) जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. शहरासह जिल्ह्यात या आजाराच्या रुग्णांत दिवसेंदिवस वाढ हाेत असून, यंदा अातापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला अाहे. 


सुरेश यांच्यावर सोमवारपासून उपचार सुरू होते. त्यांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे वैद्यकीय अहवालातून समोर आले आहे. निफाड तालुक्यातील शिरसगाव येथील संदीप भास्कर सोळसे (३०) यांनाही स्वाइन फ्लूसदृश आजाराची लक्षणे जाणवल्याने त्यांना शनिवारी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय तपासणीत त्यांना न्युमोनिया झाल्याचे स्पष्ट झाले होते. परंतु, त्यांचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. सद्यस्थितीत स्वाइन फ्लू कक्षात १६ संशयित रुग्णांवर उपचार सुरू असून प्रयाेगशाळेतील अहवालानुसार तिघांना स्वाइन फ्लू झाल्याचे निश्पन्न झाले आहे. तर उर्वरित रुग्नांचे अहवाल प्रतिक्षेत आहे.

बातम्या आणखी आहेत...