आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातात एक ठार; जमावाने जाळली स्काॅर्पिओ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - अरणगाव ते वाळकी रस्त्यावरील बाबुर्डी घुमट शिवारात भरधाव वेगात येणाऱ्या स्कार्पिओने दुचाकीस्वारास उडवले. त्यात दुचाकीस्वार सोमनाथ धर्माजी परभाने (४१, रा. बाबुर्डी घुमट) हे जागीच ठार झाले. ही घटना बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास घडली. दरम्यान, अपघातानंतर परिसरातील संतप्त जमावाने स्कार्पिओ पेटवून दिली.

 

नगर- दौंड रस्त्यावरील अरणगाव ते वाळकी रस्त्यावरील बाबुर्डी घुमट शिवारात झालेल्या या अपघातामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. भरधाव वेगात आलेल्या स्कार्पिओने (एमएच १६, बीवाय ५४७०) परभाने यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. त्यात परभाने यांचा जागीच मृत्यु झाला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले. त्यांनी स्कार्पिओ पेटवून दिली. पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. परंतु तोपर्यंत स्कार्पिओ जळून खाक झाली होती. गाडी पेटवून दिल्याने घटनास्थळी काहीवेळासाठी तणाव निर्माण झाला होता. परंतु पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली.

बातम्या आणखी आहेत...