आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागून येणाऱ्या दुचाकीने दिली जोरदार धडक, अपघातात एक जण जागीच ठार, दोन जखमींवर उपचार सुरू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल - तालुक्‍यातील किनगाव जवळ दोन दुचाकींची आपसात धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. तर एकाचा रुग्णालयात जाताना मृत्यू झाला. मृतांची नावे महेश पिंजरकर (रा. भुसावळ) आणि कुरबान महारु तडवी असे आहे. तो स्वराज ट्रॅक्टरचा सेल्समन होता. अपघात बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडला. इतर दोन जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे


बुधवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास स्वराज ट्रॅक्टर पाडळसा येथील सेल्समन महेश पिंजरकर (40) हे दुचाकी क्रमांक एम.एच. 19 बी. एल. 7365 द्वारे किनगावला जात होते. किनगाव जवळील पेट्रोल पंपासमोर मागून येणाऱ्या दुचाकी क्रमांक एम. एच.19 ए.एस.2676 च्या चालकाने त्यांना मागून जबर धडक दिली. त्यात पिंजरकर रस्त्याच्या कडेला फेकले गेले आणि जागीच ठार झाले. तर मागील दुचाकीवरील दोन जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी नेत असताना कुरबान महारु तडवी याचादेखिल मृत्यू झाला. जखमीचे नाव सलीम तडवी राहणार वरगव्हाण असे आहे

बातम्या आणखी आहेत...