यावल-फैजपूर मार्गावर अपघात, / यावल-फैजपूर मार्गावर अपघात, एकाचा मृत्यू, साखरपुड्याच्या कार्यक्रमाला जात होते कुटुंब

प्रतिनिधी

Mar 07,2019 03:53:00 PM IST

यावल- यावल-फैजपूर रस्त्यावर हंबर्डी गावाजवळ ॲपेरिक्षासमोर एक लहान मुलगा आला, त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात ॲपेरिक्षा उलटून एकाचा जागेवरच मृत्यू झाला तर तिघे जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी (ता.7) दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे साखरपुड्याच्या आनंदावर विरजण पडले आहे. राकेश रमेश सोनवणे (वय-45, रा.लहान वाघोदा, ता.रावेर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेली माहिती अशी की, लहान वाघोदे (ता.रावेर) येथील एक कुटुंब सातोद (ता. यावल) येथे ॲपेरिक्षाद्वारे साखरपुड्यासाठी येत होते. दरम्यान फैजपूर-यावल रस्त्यावरील हंबर्डी गावाजवळ अचानक एक लहान मुलगा खेळता खेळता रस्त्यावर आला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात अॅपेरिक्षा रस्त्याच्या कडेला उलटला. त्यात डोक्याला मार लागून राकेश रमेश सोनवणे याचा मृत्यू झाला तर ‍तिघे जखमी झाले. फैजपूर येथील एका खासगी रुग्णालयात जखमींना उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. राकेश सोनवणे यांचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आलेला आहे.

साखरपुड्यासाठी येणाऱ्या या कुटुंबावर अशा प्रकारे अपघात होऊन एकाचा बळी गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे

X
COMMENT