आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगरूळजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला चिरडले, साकळीतील तरुण जागीच ठार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- बऱ्हाणपूर- अंकलेश्वर राज्यमार्गावर मंगरूळ (ता.चोपडा) फाट्याजवळ दुचाकी व ट्रकच्या  भीषण अपघातात एक तरुण जागीच ठार झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे. यशवंत लक्ष्मण वाघळे (वय-25) असे मृत त‍रुणाचे नाव आहे. अपघाताचे वृत्त साकळी गावात समजताच अनेकांनी चोपडा येथे कुटीर रूग्णालयात धाव घेतली.

 

मिळालेली माहिती अशी की, साकळी (ता.यावल) येथील रहिवासी यशवंत उर्फ धर्मा लक्ष्मण वाघळे-धोबी व त्याचा मित्र विक्रम देविदास जाधव-कैकाडी(वय-20) हे दोघे दुचाकी क्रमांक (एम. एच. १९ ए. डी. ४१७१) वरून चोपड्याकडे जात असताना मंगरूळ (ता.चोपडा) फाट्याजवळ भरधाव अज्ञात मालवाहू वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातात यशवंतचा जागीच मृत्यू झाला तर विक्रम गंभीर जखमी झाला. विक्रमचा उजवा पाय मोडला आहे. दोघांना घटनास्थळावरून चोपडा येथील कुटीर रुग्णालयात हलविण्यात आले. अपघाताचे वृत्त साकळीत समजता अनेकांनी रुग्णालयात धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या ‍विक्रम याला पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात हलवण्यात आले आहे.

यशवंत उर्फ धर्मा वाघळे याच्या पश्चात पत्नी, साडेचार वर्षाची मुलगी, अडीच वर्षाचा मुलगा, आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... अपघाताची भीषणता दाखविणारे फोटो..

बातम्या आणखी आहेत...