Home | National | Other State | one family all person death in Rajasthan's Jalore

कुटुंबावर कोसळले संकट, घरात आहेत तीन महिला पण तिघीही विधवा, मुलांच्या संगोपणाचा महिलेंसमोर उभा राहिला प्रश्न...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 24, 2019, 03:40 PM IST

वडील आणि भाऊ गेल्यानंतर एकटा अशोक घर सांभाळायचा, पण आता तोही राहीला नाही

  • one family all person death in Rajasthan's Jalore

    जालोर(राजस्थान)- एका कुंटुंबासोबत दैवाने क्रुर कृत्य केले. कुटुंबात तीन महिला आहेत, पण तिघीही विधवा झाल्या आहेत. त्यामुळे कुटुंबावर मुलांच्या संगोपणाचे संकट ओढावले आहे. घटना कूकावास गावातील आहे. अशोककुमार बिश्नोई (28) रविवारी सकाळी बांद्रा वरून जोधपूरला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसले. ते मामाच्या मुलीच्या लग्नासाठी जोधपूरला जात होते, पण ट्रेनमधून ते पडले. पडल्यामुळे त्यांच्या डोक्यावर गंभीर जखम झाली आणि त्यातच त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

    वडील आणि भावाला गमवल्यानंतर फक्त एकटा राहीला होता अशोक
    अशोक कुमार यांना दोन भाऊ आणि तीन बहिणी आहेत. ते 4 वर्षांचे असताना वडील भूराराम मांजू यांचे निधन झाले. त्यावेळी अशोकचा मोठा भाऊ बीरबलराम हे 10 वर्षांचे होते. लहान वयातच वडिलांना गमवल्यानंतर दोन मुले आणि तीन मुलींच्या संगोपणाची जबाबदारी सुगणीदेवी यांच्यावर आली. अशा कठीण प्रसंगीदेखील त्यांनी मजुरी करून आपल्या मुलांचे संगोपण केले. काही वर्षानंतर मोठा भाऊ बीलबरराम मोठा झाल्यावर त्याचे लग्न केले. त्यानंतर दोन बहिणी आणि बीलबरराम यांचे आजारपणामुळे 2008 मध्ये मृत्यू झाला.

    यामुळे परत सुगणीदेवी यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. त्यांनी मजुरी करून अशोकचे संगोपण केले. पण आता अशोकचाही मृत्यू झाला आहे. रविवारी ट्रेन अपघातात अशोकचा मृत्यू झाला. यामुळे कुटुंबावर मोठे संकट आले आहे.

Trending