आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या राज्यातील सरकारने केली प्रत्येक परिवारासाठी फिक्स्ड सॅलरीची व्यवस्था, आता येथे कोणीही नसणार गरीब

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : देशभरात युवकांच्या बेरोजगारीचा मुद्दा कायम आहे. उत्तर प्रदेश. बिहार सारख्या मोठ्या राज्यांमध्ये एका परिवारासाठी एक नोकरी मिळणे कठीण झाले आहे. यामुळे या परिवारातील युवकांना दिल्ली, मुंबईसारख्या ठिकाणी इतर राज्यात नाईलाजाने नोकरी करण्यासाठी जावे लागत आहे. पण भारतातील उत्तर-पूर्व भागातील एक छोटे राज्य सिक्कीमने राज्यातील युवकांना नोकरी देण्याबाबत एक आदर्श उभा केला आहे. 

 

एका दिवसात 12 हजार लोकांना दिला रोजगार
सिक्कीमचे मुख्यमंत्री पवन कुमार चामंलिंग यांच्यातर्फे 'एक परिवार, एक रोजगार' या योजनेची सुरूवार केली आहे. याअंतर्गत राज्यातील प्रत्येक परिवारातील एका सदस्याला नोकरी देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री चामंलिंग या योजनेअंतर्गत एक दिवसात 12 हजार लोकांना रोजगार दिला आहे. सिक्कीमच्या पलजोर स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळावा 2018 मध्ये 32 विधानसभा क्षेत्रांतील दोन-दोन लोकांना आपल्या हाताने कंत्राटी नियुक्ती पत्रे दिली आहेत. 

 

पुढे वाचा....अस्थायी नोकरी करण्यात येणार स्थायी

बातम्या आणखी आहेत...