Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | one farmer died in lightning in Beed

बीड जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस, वीज कोसळून एक शेतकरी ठार, एक जखमी

प्रतिनिधी | Update - Apr 16, 2019, 09:20 AM IST

कैऱ्या जमीनदोस्त,अनेक भागांत वीजपुरवठा खंडित, बाजारकरूंची तारांबळ

  • one farmer died in lightning in Beed

    बीड- बीड जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी पाच वाजता बीड शहरासह आष्टी, शिरूर, गेवराई तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळला. बीड तालुक्यातील खांडेपारगाव येथील गुरांच्या छावणीत गोठ्याजवळ वीज कोसळून भारत आमटे (४०) हा शेतकरी जखमी झाला. तर धारूर तालुक्यातील देवदहीफळ रस्त्यावरील वड्डेवस्तीवर वीज कोसळल्याने श्रीहरी भानुदास वड्डे (४०) हा शेतकरी ठार झाला.


    सायंकाळी शिरूर तालुक्याला वादळी पावसाने झोडपले. शिरूर शहरातही सायंकाळी जोरदार पाऊस झाला. पाऊस आणि वादळामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. सोमवारी आठवडी बाजार असल्याने बाजारास आलेल्या व्यापाऱ्यांची आणि बाजारकरूंची यामुळे तारांबळ उडाली. दुपारी तापमानाचा पारा चाळीस अंशांवर


    पोहोचला होता. या पावसाने बाजारातील आणि रस्त्यावर विक्री व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांची धावपळ उडाली. बाजारकरूंनाही पावसामुळे घरचा रस्ता धरावा लागला. अर्धा तास पडलेल्या पावसाने रस्त्यावर पाणी साचले होते. दरम्यान,बीड शहरातही सायंकाळी पाच वाजता जोरदार पाऊस झाल्याने रस्त्यावरील हातगाड्या चालकांची धावपळ उडाली.

Trending