आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • One Farmer Killed And One Seriously Injured In Wagahini Attack

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाघिणीच्या हल्यात मेळघाटातील एका शेतकऱ्या मृत्यू तर एक गंभीर जखमी, परिसरात पसरली दहशत

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

धारणी-चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीच्या जंगलातून आणलेल्या वन वाघिणीने मेळघाटात केलेल्या हल्ल्यात एक शेतकरी ठार झाला तर शेतकऱ्याचा सहकारी गंभीर जखमी झाला. शोभाराम कालुसिंग चव्हाण (वय 45 ) असे मृत शेतकऱ्याचे तर दिलीप सरदार चव्हाण (वय 38) असे गंभीर सहकाऱ्याचे नाव आहे. मेळघाटातील धारणी तालुक्यातील दादरा येथे ही घटना शुक्रवारी (30 ऑगस्ट) रात्री 11.30 वाजताच्या सुमारास घडली. 

मेळघाटात आदिवासी शेतकरी मक्याची शेती करतात. वन्य प्राणी शेताची नासधुस करीत असल्याने रात्री जागरण करण्याकरिता शेतकऱ्यांना शेतात जावे लागते. मृतक शोभाराम आणि जखमी दिलीप त्यांच्या दादरा येथील मक्याच्या शेताची रखवाली करण्याकरिता गेले होते. शेतात मचाणीवर झोपले असता वाघिणीने अचानक हल्ला चढवित शोभारामच्या नरडीचा घोट घेतला. दिलीपने आरडाओरड केली असता वाघिणीने त्याच्यावर देखील हल्ला चढविला. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ मदतीला धावून आले. मात्र, तोपर्यंत वाघिणीने फरफटत नेल्याने शोभाराम याचा मृत्यू झाला. 
 
या घटनेने परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच माजी आमदार राजकुमार पटेल यांनी रात्रीच दादरा गाव गाठले. तर आमदार प्रभुदास भिलावेकर यांनी दुरध्वनीवरून संपर्क साधत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर वन विभागाने वाघिणीला जेरबंद करण्याचे आदेश दिल्याची माहिती अपर प्रधान मुख्य वनसरंक्षक तथा मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एम. एस. रेड्डी यांनी दिली.मृतक शोभारामचे शवविच्छेदन न करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला होता. मात्र, प्रशासनासोबत चर्चा झाल्यानंतर आज दुपारी 3 वाजता शोभाराम यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. शिवाय पिडीत कुटुंबाला 5 लाख रुपयांचा धनादेश धारणीचे उपविभागीय अधिकारी राहुल जाधव यांनी स्वाधीन केला. तर मृतकाच्या मुलाला वन विभागात नोकरी देण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.
 
चंद्रपूर जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या वन वाघिणीला दोन महिन्यांपूर्वी ब्रह्मपुरी येथून मेळघाटातील गुगामल वन्यजीव व्याघ्र प्रकल्पाच्या डोलार या जंगलात सोडण्यात आले होते. चवताळलेल्या या वाघिणीने डोलारपासून ते राणीगाव पर्यंतच्या जंगल परिसरात धुमाकूळ घातला आहे. दोन महिन्यात अनेक पाळीव प्राण्याची शिकार देखील केली आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser