• Home
  • National
  • One hundred days of government are development, important changes: Narendra Modi

रोहतक / सरकारचेे शंभर दिवस विकास, महत्त्वाच्या बदलांचे : नरेंद्र मोदी

मोदी सरकारचे १०० दिवस विकासहीन. लोकशाहीला नष्ट करणारे ठरले. अर्थव्यवस्थाही मंदावली.- राहुल गांधी

Sep 09,2019 07:50:00 AM IST

रोहतक - केंद्रातील नरंेद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला रविवारी १०० दिवस पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी हरियाणातील रोहतकमध्ये बोलताना सरकारचे हे शंभर दिवस केवळ विकास आणि मोठ्या बदलांचे राहिले असल्याचा दावा केला. विरोधी पक्षांवर टीका करताना ते म्हणाले, विरोधक पराभवामुळे इतके खचले आहेत की त्यांना काय घडते आहे हे कळेनासे झाले आहे. महाराष्ट्रापाठोपाठ मोदींची ही हरियाणातील विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शुभारंभासाठी आयोजित जाहीर सभा होती. त्यांनी हरियाणासाठी २ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. चांद्रयानाबद्दल बोलताना मोदी म्हणाले, ७ सप्टेंबरला रात्री १.५० वाजता अवघा देश टीव्हीसमोर होता. या १०० सेकंदांनी भारतील लोक मनाने जोडले गेले.


भारतीय अर्थव्यवस्था भक्कम -जावडेकर : माहिती-प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी सांगितले की, भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया भक्कम आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. सरकारच्या १०० दिवसांचा आढावा घेताना ते म्हणाले, भारताचा गेल्या ५ वर्षांत विकास दर ७ टक्के होता. तो यापुढेही कायम राहील, अशी खात्री आहे. जागतिक मंदीचा परिणाम होऊ शकतो. परंतु, विदेशी गुंतवणूक येत आहे. बाजारात मागणीही आहे.

कलम ३७१ कायम राहील : अमित शहा

गोहत्ती - काश्मीरमधील ३७० कलम रद्द झाले असले तरी ईशान्य भारताला विशेष दर्जा देणारे कलम ३७१ कायम राहील, अशी हमी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येथे आयोजित ईशान्य परिषदेच्या ६८ व्या सर्वसाधारण सभेत दिली.


हे तर विकासहीन दिवस
> मोदी सरकारचे १०० दिवस विकासहीन. लोकशाहीला नष्ट करणारे ठरले. अर्थव्यवस्थाही मंदावली.- राहुल गांधी
> अर्थव्यवस्था खिळखिळी झाली तरी सरकार गप्प आहे. व्यापार ठप्प आहे. जनतेची दिशाभूल सुरू आहे.
- प्रियंका गांधी

X