आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • One In Seven Indians Suffer From Mental Illness, The Most Depressed Among South, North India The Least Worrying

सातपैकी एक भारतीय मानसिक आजाराचा बळी, दाक्षिणात्यांमध्ये सर्वात जास्त नैराश्य, उत्तर भारतीय सर्वात कमी चिंता करणारे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॅन्सेंट सायकिअॅट्रीचा अहवाल, 1990 च्या तुलनेत देशातील मानसिक रुग्णांमध्ये दुप्पट वाढ
  • तज्ज्ञ म्हणाले- सर्वात मुख्य कारण मानसिक आजाराकडे दुर्लक्ष करणे

​​​​​नवी दिल्ली : २०१७ मध्ये देशात दर सातपैकी एक जण विविध प्रकारच्या मानसिक आजारांनी त्रस्त हाेता. यामध्ये नैराश्य, चिंता व सिझाेफ्रेनियामुळे लाेक सर्वात जास्त त्रस्त हाेते. नैराश्य व चिंता सामान्य समस्या आढळून आल्या. अंदाजे ४ काेटी लाेक या दाेन आजारांनी पीडित हाेते. या दाेन्हीचे प्रमाण देशात वाढत असल्याचे दिसत आहे. तसेच महिला व दक्षिण राज्यांत याचा परिणाम जास्त दिसला. आश्चर्यजनक बाब म्हणजे २०१७ मध्ये मानसिक अाजारी रुग्णांची संख्या १९९० च्या तुलनेत दुप्पट झाली असल्याची माहिती लॅन्सेट सायकिअॅट्रीने साेमवारी जाहीर केलेल्या एका अभ्यासात दिली. त्यानुसार २०१७ मध्ये देशात १९.७ काेटी व्यक्ती मानसिक आजाराने पीडित हाेत्या. या रुग्णांमध्ये वयस्करांचेे प्रमाण जास्त अाहे. नैराश्याने अात्महत्येचे प्रमाण वाढले आहे. उत्तर भारतीय राज्यांत लहानपणी हाेणाऱ्या मानसिक विकारांचे प्रमाण जास्त दिसले. पण देशभरातील मुलांमध्ये अशा प्रकारचे प्रमाण पहिल्यापेक्षा कमी आहे. सर्व मानसिकग्रस्तांमध्ये ३३.८ % नैराश्य, १९ % चिंता व ९.८ % सिझाेफ्रेनियाने ग्रस्त हाेते. एम्सचे प्राध्यापक व मुख्य संशाेधक राजेश सागर यांच्या मते या विकारांकडे दुर्लक्ष केल्याने मानसिकग्रस्तांची संख्या जास्त आहे. मानसिक आराेग्य सेवांचा सामान्य तपासणी सेवेत समावेश करून उपचार घेण्यासाठी लोकांच्या मनातील संकोच दूर करण्याची गरज आहे. १९९० मध्ये एकूण रुग्णांच्या संख्येत २.५ % मानसिक राेगाने त्रस्त हाेते. २०१७ मध्ये ही संख्या वाढून ४.७ % झाली. जागतिक आराेग्य संघटनेच्या २०१७ च्या अहवालानुसार देशाच्या लाेकसंख्येपैकी ७.५ % मानसिक राेगाने त्रस्त हाेते. २००५ ते २०१५ दरम्यान नैराश्याचे प्रमाण १८ % वाढले. तेव्हा जगभरात अंदाजे सव्वातीन काेटी पीडित हाेते.

तामिळनाडूत सर्वात जास्त नैराश्य, सर्वात कमी चिंता मध्य प्रदेशात

सर्वात जास्त नैराश्य

क्रम : राज्य
1. तामिळनाडू
2. आंध्र प्रदेश
3. तेलंगण
4. कर्नाटक
5. ओडिशा
6. अरुणाचल

सर्वाते कमी चिंता


क्रम : राज्य
1. मध्य प्रदेश
2. छत्तीसगड
3. उत्तर प्रदेश
4. बिहार
5. मेघालय
6. केरळ*