आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावल शहरात वाळू वाहून नेणारे ट्रॅक्टर कलंडले, ट्रॉलीखाली दाबून एक गंभीर जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जखमी  गफ्फार हमदू पटेल (वय-50, रा. बोरावल गेट परिसर) - Divya Marathi
जखमी गफ्फार हमदू पटेल (वय-50, रा. बोरावल गेट परिसर)

यावल- शहरातील भालशिव रस्त्यावर वाळूचे भरधाव वेगाने येणारे ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला कलंडल्याने एक जण गंभीर जखमी झाला. शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारात हा अपघात घडला. गफ्फार हमदू पटेल (वय-50, रा. बोरावल गेट परिसर) असे जखमी व्यक्तीचे नाव असून त्याच्यावर यावल ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून जळगाव येथे हलवण्यात आले आहे.

 

मिळालेली माहिती अशी की, भालशिव गाव तापी नदीच्या काठावर वसले आहे. तापी नदीतून अवैधपणे वाळू उपसा करून ट्रॅक्टरद्वारे ती शहरात विविध भागात आणली जाते. वाळू अवैधरीत्या वाहतूक करणारे ट्रॅक्टर या भागातून भरधाव वेगात धावत असतात. दरम्यान शनिवारी संजय भगवान भोई यांचे ट्रॅक्टर वाळू घेऊन शहरात आले. खंडोबा मंदिराजवळ चालकाचा वाहनावरील ताबा सुटून ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला कलंडला. ट्रॉली बसलेले गफ्फार हमदू पटेल हे ट्रॉलीखाली दाबले गेले. त्यांचे कमरेचे उजव्या बाजुचे हाड मोडले. पटेल यांनी तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. डॉ. शुभम जगताप, संगीता डहाके यांनी प्रथमोपचार करून त्यांना जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...