Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | One kg gold jewelery of 40 lakhs stolen from Dadar and Chennai Express

दादर-चेन्नई एक्स्प्रेसमधून ४० लाखांचे एक किलो सोने दागिने चोरीनंतर संशयकल्लोळ!

प्रतिनिधी | Update - Sep 03, 2018, 10:23 AM IST

दादर-चेन्नई एक्स्प्रेसच्या प्रथम श्रेणी वातानुकूलित दर्जाच्या डब्यातून प्रवाशाचे सुमारे एक किलो वजनाचे सोन्याचे दागिने

 • One kg gold jewelery of 40 lakhs stolen from Dadar and Chennai Express

  सोलापूर- दादर-चेन्नई एक्स्प्रेसच्या प्रथम श्रेणी वातानुकूलित दर्जाच्या डब्यातून प्रवाशाचे सुमारे एक किलो वजनाचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची तक्रार देण्यात आली. त्यांची किंमत सुमारे चाळीस लाख रुपये अाहे. ही घटना ३१ जुलै रोजी रात्री साडेतीनच्या सुमारास कुर्डुवाडी ते सोलापूर दरम्यान घडली आहे. विपुल कुमार (रा. नेल्लोरे, आंध प्रदेश) हे आपल्या पत्नीसमवेत मुंबईहून दादर-चेन्नई रेल्वेने निघाले होते. ते एच ए १ या डब्यातून प्रवास करत होते. मध्यरात्री साडेतीन ते चारच्या सुमारास पत्नीजवळ असलेल्या पर्समधून सोन्याचे दागिने ठेवलेल्या डबा चोरीला गेला. या वेळी विपुल कुमार यांनी डब्यातील तिकीट पर्यवेक्षकांकडे चोरीची तक्रार दिली.


  एवढ्या 'विपुल' प्रमाणात सोने नाहीच ?
  चाळीस लाख रुपयांची चोरी असल्याने आरपीएफ व लोहमार्ग पोलिसही चक्रावून गेले. त्यांनी लागलीच आपली तपास यंत्रणा कामाला लावली. तसेच विपुल कुमार यांची चौकशी करण्यास सुरुवात केली. मात्र चौकशीवेळी विपुल कुमार पोलिसांना वेगवेगळी व उडावाउडवीची उत्तरे देत होता. प्रकरण गंभीर असल्याने पोलिसांनी थेट आंध्रातील त्याचे घर गाठले. मात्र त्याचे नातलगही या चोरीवरून संशय व्यक्त करीत आहेत. नातलगांच्या म्हणण्यानुसार विपुल याच्याकडे इतके सोने असूच शकत नाही. त्यामुळे ही चोरीच आता संशयाच्या भोवऱ्यात सापडली अाहे. विपुल कुमारने अद्याप लोहमार्ग पोलिसात तक्रार दिलेली नाही. मंगळवारी तो सोलापूरला येणार आहे. त्यानंतर अधिक उलगडा होईल.


  दादर-चेन्नई एक्स्प्रेसमधील घटनेबाबत संशय व्यक्त केला जात आहे. संबंधित प्रवाशाला सोलापूरला बोलावण्यात आले आहे. नेमके प्रकरण काय? हे त्याच वेळी समजेल.
  - जयण्णा कृपाकर, विभागीय सुरक्षा आयुक्त,आरपीएफ, सोलापूर

Trending