आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हनुमानगड - राजस्थानातील हनुमानगड जिल्हा रुग्णालयात एका १८ वर्षीय तरुणीच्या पोटातून डॉक्टरांनी केसाचा किलोभर गुंता काढला आहे. डॉक्टरांनी सांगितले, जिल्हा रुग्णालयात प्रथमच अशा प्रकारची शस्त्रक्रिया झाली आहे. या तरुणीचे नाव पूनम आहे. तिला ट्रायकॉबेजोर नावाचा आजार आहे. तपासणीत ती मानसिकदृष्ट्या विकलांग आहे. गेल्या दहा वर्षांपासून ती डोक्यावरचे केस उपटून खात होती. तिला पोटाच्या दुखण्याचा आजार होता. तिच्या पोटात केसाची गाठ तयार झाली होती व वजनही कमी झाले होते. रुग्णालयात आल्यानंतर सीटी स्कॅन व इतर तपासण्या केल्या. तेव्हा तिच्या पोटात केस दिसले. त्यानंतर तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. जिल्हा रुग्णालयातील शल्य चिकित्सक डॉ. के. के. शर्मा यांनी सांगितले, मानसिक विकलांग काही तरुणी केस उपटून खातात. पचन न झालेले केस पोटात साचतात. त्याचा गोळा तयार होतो व आकारही वाढतो.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.