आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामथुरा - येथून जवळच असलेल्या कोसी कलाण रेल्वे स्थानकावर रेल्वेने सात जणांना उडवले. या घटनेत एका जणाचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हे सात जण रेल्वेपटरी ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना छत्तीसगड संपर्क क्रांती एक्सप्रेसने त्यांना उडवल्याची माहिती मिळाली आहे.
रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी पाऊणे आठ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. आग्रा-नवी दिल्ली या प्रचंड गर्दी असलेल्या रेल्वेमध्ये जागा पकडण्यासाठी लोकांची एकच गर्दी उडाली होती. त्याचवेळी काही लोक दुसऱ्या बाजुच्या प्लॅटफॉर्मवरून येऊन जागा पकडण्याचा प्रयत्न करत होते. पण त्याचवेळी छत्तीसगज संपर्क क्रांती एक्सप्रेस स्टेशनवर आली. या रेल्वेचा स्टेशनवर थांबा नव्हता. त्यामुळे प्रवासी वेगाने जाणाऱ्या या रेल्वेला धडकल्याने अपघात घडला. या अपघातानंतर रेल्वे स्टेशनवर एकच आरडा ओरड सुरू झाली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.