आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पिंपळनेर-नवापूर रस्त्यावरील पानखेडा गावाजवळ आयशर ट्रक व स्कुटीत भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू तर दोघे गंभीर जखमी

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
इनसेटमध्ये मयत मिथुन पवार - Divya Marathi
इनसेटमध्ये मयत मिथुन पवार
  • स्कुटीचालक मिथुन बाळू पवार यांचा घटनास्थळीच मृत्यू तर आयशर चालक राजेंद्र अमृत पाटील व सहचालक विजय मोहन राठोड गंभीर जखमी

पिंपळनेर- येथून जवळच असलेल्या पिंपळनेर-नवापूर रस्त्यावरील पानखेडा गावाजवळ आयशर ट्रक (क्रमांक जीजे.19 एक्स 8383) व स्कुटी (क्रमांक एमएच 48 बीबी 1857) यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात स्कुटीचालक  मिथुन बाळू पवार (वय 36 रा.हारपाडा,ह.मु.मुंबई) जागीच ठार झाला असून वाहनचालक व सहचालक गंभीर जखमी झाले आहेत.


पानखेडा येथील नाल्याजवळील वळणावर आयशर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व त्याचवेळी समोरून येणाऱ्या स्कुटीचालक मिथुन बाळू पवार यांच्या स्कुटीला जबर धडक दिल्याने दोन्ही वाहने रस्त्यालगत असलेल्या झाडांमध्ये अडकली. अपघात इतका भीषण होता की आयशर ट्रकची कॅबिन व स्कुटीचा चक्काचूर झाला. तर स्कुटीचालक मिथुन पवारचा मृतदेह छिन्न विच्छिन्न अवस्थेत पडलेला होता. वाहनचालक व सहचालक बऱ्याचवेळेपर्यंत कॅबिनमध्ये अडकून पडले होते. मात्र स्थानिक गावकऱ्यांनी व पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने त्यांना बाहेर काढले.

स्कुटीचालक मिथुन बाळू पवार याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर आयशर चालक राजेंद्र अमृत पाटील ( रा.धारमालपूर, अमळनेर, जि.जळगाव )  व  सहचालक विजय मोहन राठोड (रा. जोरवा, गुजरात) हे दोन्ही गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णवाहिकेने पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून धुळे जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. तर मिथुन बाळू पवारचे शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. सायंकाळी उशिरा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मृतकाचा भाऊ अनिल पवार याने पिंपळनेर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास युवराज पवार करीत आहेत. आयशर ट्रक हा अमळनेर येथुन वन विभागाचे लिलावाचे सागवानी लाकुड घेऊन गुजरात मध्ये जात होता. अपघातानंतर लाकडाने भरलेला आयशर ट्रक एका बाजूला कलंडल्याने अडचण निर्माण झाली होती.  तर स्कुटीचालक मिथुन पवार हा पिंपळनेरकडे भाऊ व बहिणीला भेटण्यासाठी स्कुटीने येत होता. या भागात अनेकदा भीषण अपघात झाले असून त्याची अपघात प्रवण क्षेत्र अशी ओळख झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांनी आपला वेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
मिथुन बाळू पवार हा मुंबई येथे अग्निशमन दलात फायरमन आहे. 5 वर्षांपूर्वी त्याला नोकरी लागली होती. त्याला आई,वडिल,दोन भाऊ, एक बहीण,पत्नी एक 8 वर्षाचा मुलगा व एक 12 वर्षाची मुलगी असा परिवार आहे.

अखेरची भेट ठरली:-

मिथुन पवार आपल्या परिवाराला मुंबईहून भेटण्यासाठी हारपाडा ता.साक्री या आपल्या मुळगावी आला होता. आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास हारपाड्याहुन पिंपळनेर येथे 
भाऊ व बहिणीला भेटण्यासाठी स्कुटीने येत होता. त्यांना भेटून तो मुंबईला जाणार होता. मात्र रस्त्यातच त्याच्यावर काळाने झडप घातली त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.पिंपळनेरला राहणाऱ्या भावा-बहिणीला भेटण्याची ईच्छाही अपूर्ण राहिली तर आई-वडिलांची घेतलेली भेट अखेरची ठरली.बातम्या आणखी आहेत...