आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सवातील वर्गणीवरून भांडणात कोपर्डीत एकाचा खून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्जत - गणेशोत्सवाच्या वर्गणीचा हिशेब मागितल्याचा राग येऊन कोपर्डी येथे १५ ला रात्री झालेल्या भांडणात शिवाजी ऊर्फ संजय किसन सुद्रिक (४५ वर्षे) याचा खून झाला. गणेश बंकट सुद्रिक (३० वर्षे) हा जखमी झाला आहे. या प्रकरणी संदीप गोरख सुद्रिक व अतुल विशाल सुद्रिक (कोपर्डी) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

 

बबन चव्हाण यांच्या किराणा दुकानासमोर शिवाजी ऊर्फ संजय किसन सुद्रिक व संदीप गोरख सुद्रिक हे गप्पा मारत होते. शिवाजी याने संदीपला गणपतीची वर्गणी किती झाली, खर्च किती झाला आणि किती पैसे शिल्लक राहिले याचा हिशेब विचारला. त्याचा राग संदीपला आला. त्यांच्यात बाचाबाची सुरू असतानाच संदीपचा पुतण्या अतुल विश्वनाथ सुद्रिक तेथे आला. भांडण सोडवण्यासाठी गणेश बंकट सुद्रिक आला असता त्यालाही संदीप आणि अतुलने मारहाण केली. संजयच्या डोक्यास जबर मार लागून तो खाली कोसळला.

 

त्याचा मुलगा मनोज आणि इतरांनी त्यास कुळधरण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले, पण डॉक्टरांनी तो मरण पावल्याचे सांगितले. पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण व उपनिरीक्षक एस. पी. माने कोपर्डीला गेले, मात्र तोपर्यंत संदीप व अतुल पळून गेले होते. मनोज सुद्रिकच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींच्या तपासासाठी पथके पाठवण्यात आली आहेत

बातम्या आणखी आहेत...