Home | Maharashtra | Vidarva | Akola | One killed in truck - auto-rickshaw accident in murtijapur

ट्रक- ऑटोरिक्षाच्या अपघातात एक जण ठार, तीन गंभीर जखमी

प्रतिनिधी | Update - Aug 07, 2018, 12:41 PM IST

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील चावला पेट्रोल पंपासमोर सोमवारी ६ ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास ऑटोरिक्षा व

  • One killed in truck - auto-rickshaw accident in murtijapur

    मूर्तिजापूर- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील चावला पेट्रोल पंपासमोर सोमवारी ६ ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास ऑटोरिक्षा व ट्रकच्या झालेल्या अपघातात ३० वर्षीय युवक ठार झाला, तर तिघे गंभीररित्या जखमी झाले.

    या संदर्भात पोलिस सूुत्रांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार अकोला येथून कामरगाव येथे जात असलेला ऑटो रिक्षा क्रमांक एमएच ३०, बीसी १२१५ हा राष्ट्रीय महामार्गावरील चावला पेट्रोल पंपासमोर आला असताना मूर्तिजापूरकडून अकोलाकडे निघालेला ट्रक क्रमांक एमएच २७, ८६८ यांच्यात जोरदार धडक झाली. अपघातातील जखमींना नागरिकांच्या मदतीने मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.


    जखमींमध्ये जावेदखाँँ अमानुल्ला खाँ, वय ३० वर्षे, रा. खारमोहम्मद प्लाट, सय्यद सलमान सय्यद रहीम, वय २४ वर्षे, नादिया परविन आलिम शहा, वय २५ वर्षे, शबाना परवीन अबू साहद, वय ३० वर्षे, रा. खार मोहम्मद प्लाट, आरपीटीएस, भगतवाडी अकोला यांचा समावेश होता. सर्व जखमींना पुढील उपचारार्थ अकोला येथे पाठवले असता रस्त्यातच जावेदखाँ अमानुल्लाखा यांचा डोक्याला जबर मार लागल्याने मृत्यू झाल्याचे समजले. या अपघातप्रकरणी पुढील तपास मूर्तिजापूर शहर पोलिस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल दीपक पुंडगे व पद्माकर लंगोटे हे करत आहेत.

Trending