आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पातूर येथे ट्रकची दुचाकीला धडक मामा ठार; भाची गंभीर जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पातूर- पातूर ते वाशीम महामार्ग हा अपघात मार्ग ठरत आहे. या महामार्गावर नेहमी जड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते त्या मुळे छोट्या वाहन धारकांना अपघातामुळे आपले प्राण गमवावे लागत आहेत. 


अशीच एक घटना सोमवारी १८ सप्टेंबरच्या रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली. या संदर्भात प्राप्त माहिती नुसार आपल्या गावाकडून पातूरकडे येत असलेली दुचाकी क्रं. एम. एच. ३७ ई ६४५४ या दुचाकीवर आपल्या भाचीसह विठ्ठल धंदरे रा. कोसगाव हे कामानिमित्त येत असताना पातूर तहसील कार्यालयासमोरील एका ब्रेकरजवळ अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिल्यामुळे विठ्ठल धंदरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यांच्या सोबत असलेल्या त्यांच्या भाचीला गंभीर मार लागल्यामुळे तिला अकोला येथील सर्वोपचार रुग्णालया उपचारार्थ हलवण्यात आले. 


या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिस व नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह विच्छेदनासाठी अकोला येथे पाठवला. येथे झालेली ही दुसरी दुर्दैवी घटना असल्याची चर्चा घटनास्थळी ऐकावयास मिळत होती. वृत्त लिहिपर्यंत ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

बातम्या आणखी आहेत...