आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • One Kilogram Of Gold Hidden Under Head Wrap, Smugglers Arrested At Kochi Airport

डोक्यावरचे केस कापून विगखाली लपवले एक किलो सोने, कोचीन एअरपोर्टवर तस्कर अटक 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोच्ची : केरळच्या कोचीन एअरपोर्टवर एक व्यक्ती आपल्या विगमध्ये सोन्याची तस्करी करताना पकडला गेला. पोलिसांनी सांगितले की, आरोपीचे नाव नौशाद आहे. तो केरळच्या मलाप्पुरमचा राहणारा आहे. तो शनिवारी शारजाहहून भारतात परतला आणि कोचिन एअरपोर्टवर उताराला.  

कस्टम अधिकाऱ्यांना त्याच्या केसांची स्टाईल पाहून संशय आला. अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केली तेव्हा विगच्या आतमध्ये एक गाठोडे ठेवले होते. ज्यामध्ये एक किलो सोने मिळाले. कस्टम अधिकाऱ्यांनी सांगितले की, मेटल डिटेक्टरने त्याची तपासणी केली तेव्हा डोक्यावर एक धातू लपलेला असल्याची बाब समोर आली. 

दिब्रुगड एअरपोर्टवर वयस्कर व्यक्तीच्या पोटात मिळाले होते दीड किलो सोने... 
याचवर्षी मेमध्ये आसामच्या दिब्रुगड एअरपोर्टवर तैनात सीआयएसएफ अधिकाऱ्यांना एका वयस्कर व्यक्तीच्या पोटातून दीड किलो सोन्याची 9 बिस्किटे मिळाली होती. आरोपीने पकडल्या जाण्याच्या भीतीने सांगितले की, त्याला या कामासाठी मोठी रक्कम मिळते. त्याने कोणत्याही प्रकारची सर्जरी न करता गुद्दद्वाराद्वारे  सोने पोटात आणण्याची प्रॅक्टिस केली होती.
 

बातम्या आणखी आहेत...