आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • One Lakh Cell Phones Used For The Shooting Of Rajinikanth And Akshay Kumar Starrer Two Point Zero

'2.0' या देशातील सर्वात महागड्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी झाला एक लाख मोबाइलचा वापर, 50 कोटींत तयार झाला सेट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार स्टारर ‘2.0’ हा देशातील आजवरचा सर्वात महागडा चित्रपट असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटाचे एकुण बजेट तब्बल 543 कोटी आहे. या चित्रपटात हेवी व्हीएफएक्सचा वापर करण्यात आला आहे. अलीकडेच याचा टीजरही रिलीज करण्यात आला. डॉ. रिचर्ड टेलिकॉम कंपन्यांकडून सूड घेण्यासाठी शहरातील सर्व लोकांचे मोबाइल हिसकावून घेत असल्याचे टीजरमध्ये दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होण्यापूर्वी नोकिया कंपनीचा चेन्नईतील प्लांट बंद झाला होता. त्यामुळे निर्मात्यांनी कमी किंमतीत या कंपनीचे मोबाइल विकत घेण्याचा निर्णय घेतला. सोबतच अनेक डमी फोनही गोळा करण्यात आले होते. आता चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून प्रॉडक्शन हाऊसकडे सुमारे एक लाख मोबाइल जमा झाले आहे. हा चित्रपट एकुण 13 भाषांमध्ये डब केला जाणार आहे. अभिनेता अक्षय कुमार यात खलनायकाच्या भूमिकेत आहे. 

 

50 कोटींमध्ये तयार झाला चित्रपटाचा सेट...

- चित्रपटाच्या शूटिंगसाठी सुमारे 50 कोटींचा खर्च करुन भव्य सेटची निर्मिती करण्यात आली होती. पहिले सेटचा निर्मिती खर्च 32 कोटी रुपये होता. पण नंतर 10 कोटी रुपयांच्या स्पेशल गोष्टी आणि सहा कोटी रुपये स्पेशल व्हेइकल्सवर खर्च कऱण्यात आले. चेन्नईमध्ये चित्रपटाचा सेट एक हजार कारागिरांनी तयार केला. सेटच्या काही भागांत इवीपी फिल्म सिटी, गोकुलम स्टूडियो, प्रसाद स्टूडियो आहेत. 


सेटवर बनवण्यात आला अडीच किलो मीटर लांब रस्ता... 

चित्रपटाचे प्रॉडक्शन डिझायनर मुथूराज सांगतात, ‘चित्रपटासाठी मेट्रो सिटीचा सेट बनवण्यात आला होता. यामध्ये अनेक हायराइज बिल्डिंग्स दाखवण्यात आल्या. यासाठी आम्ही 35 फूट उंच स्ट्रक्चर बनवले आणि कॉम्प्युटर ग्राफीक्सच्या मदतीने त्यांना आकाशाला भिडणा-या बिल्डिंगच्या रुपात सादर केले. स्टुडिओत एक रस्ताही बनवण्यात आला, जो अडीच किलोमीटर लांब होता. कारण ख-या रस्त्यांवर रजनी सरांसोबत शूटिंग करणे शक्य नव्हते, त्यामुळे सेटवरच रस्ता बनवणे गरजेचे होते.'

 

रोबोटिक लॅब आणि फुटबॉल स्टेडिअमचाही बनवण्यात आला सेट..  
टीमने स्टुडिओत एक रोबोटिक लॅब आणि वर्कशॉप बनवले. स्टुडिओत जवाहरलाल नेहरू स्टेडिअम, फुटबॉल मैदानही तयार करण्यात आले. यशिवाय 40 दिवसांचे चित्रीकरण नवी दिल्लीच्या फुटबॉल स्टेडिअममध्ये झाले. येथे अनेक अॅक्शन सीन शूट करम्यात आले. एका फाइट सीनमध्ये चिट्टी आर्मीसोबत लढतो, यासाठी T-70 टँकचा डुप्लीकेट बनवण्यात आला. शंकर यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट यावर्षी 29 नोव्हेंबर रोजी रिलीज होतोय.  


पुढील स्लाईड्सवर बघा, चित्रपटाच्या सेटचे निवडक फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...