आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यूट्यूबला एक लाख काेटी रुपयांचा महसूल, कंपनीच्या एकूण महसुलात त्याचा ९ % वाटा

एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सुंदर पिचाई सीईओ झाल्यानंतर गुगलची पालक कंपनी अल्फाबेटने पहिल्यांदाच यूट्यूबच्या जाहिरात व क्लाऊडचा महसूल जाहीर केला आहे. गेल्या वर्षात यूट्यूबचा जाहिरात महसूल ३६ % वाढून १,५१५ काेटी डाॅलरवर (१लाख काेटी रुपये)गेला. २०१८  मध्ये १,११६ काेटी डाॅलर (७९ हजार काेटी रुपये) झाला हाेता. यूट्यूबचा वार्षिक जाहिरात महसूल ४७२ काेटी डाॅलर (३३ हजार ६८१ काेटी रुपये) झाला. हे आकडे ऑक्टाेबर-डिसेंबर तिमाहीतील आहे. डिसेंबर तिमाहीत अल्फाबेटचा एकूण महसूल १७ % वाढून ४,६००  काेटी डाॅलरवर (३.२८ लाख काेटी रुपये)गेला.पूर्ण वर्षात अल्फाबेटचा एकूण महसूल  १२.२६ लाख काेटी रुपये झाला. पिचाई यांच्या नेतृत्वाखाली अल्फाबेटने पहिल्यांदा तिमाही व वार्षिक आर्थिक निकाल जाहीर केले. अल्फाबेटला क्लाऊड व्यवसायातून ६३,६५३ काेटी रुपये उत्पन्न मिळाले. २०१८ मध्ये ४१,६७४ काेटी रुपयांचे उत्पन्न मिळाले हाेते. कंपनीला  एकूण नफा  ७५,६४१ काेटी रुपयांचा झाला.