आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • One Lakh Crores Of Rupees Stuck In The DHFL Of The Common Man Along With The Banks

बँकांसह सामान्य नागरिकांचे डीएचएफएलमध्ये अडकले एक लाख कोटी रुपये

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दिवाण हाउसिंग फायनान्स लिमिटेड (डीएचएफएल) मध्ये बँका आणि इतर वित्तीय संस्थांचे एक लाख कोटी रुपये अडकलेले आहेत. कंपनीने एक हजार कोटी रुपयांचे व्याज थकवल्यानंतर आता हा पैसा धोक्यात असल्याबाबतची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली. याचा बँकेतर वित्तीय कंपन्या (एनबीएफसी), गृह कर्ज कंपन्या (एचएफसी), रिअल इस्टेट, वाहन आणि एमएसएमई क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे.  ग्लोबल रिसर्च आणि आंतरराष्ट्रीय ब्रोकिंग संस्था सीएलएसएने त्यांच्या अहवालात असे नमूद केले आहे. डीएचएफएलला देण्यात आलेल्या १ लाख कोटी रुपयांच्या कर्जात ५० टक्के पैसा बँकांनी दिलेला आहे. उर्वरित पैसा विमा कंपन्या आणि म्युच्युअल फंडांचा आहे. सुमारे १० % पैसा जमाच्या माध्यमातून सामान्य लोकांचा आहे. म्युच्युअल फंडाची डीएचएफएलमधील सरळ गुंतवणूक ५,००० कोटी रुपयांची आहे. यात सरळ ७५ टक्के घट होऊ शकते. बाँडमध्ये करण्यात आलेल्या गुंतवणुकीवर बँकांना सरळ (मार्क टू मार्केट) नुकसानही १२% 
असू शकते. 

 

५८ हजार कोटींच्या कर्जाचे मानांकन आतापर्यंत झाले कमी 
मानांकन संस्था ब्रिकवर्कने सुमारे ५८,००० कोटी रुपयांचे कर्ज आतापर्यंत डाउन ग्रेड केले आहे. यामध्ये नाॅन-कन्व्हर्टिबल डिबेंचर (एनसीडी) मध्ये गुंतवलेले २९,००० कोटी रुपये आणि ८,९४० कोटी रुपयांच्या एफडीचा समावेश आहे.

 

सहयोगी कंपन्यांमधील भागीदारीची विक्री करतेय डीएचएफएल
डीएचएफएल अनेक दिवसांपासून संकटाचा सामना करत आहे. त्यामुळे कंपनीने वाधवान ग्लोबल कॅपिटलची अनेक सहयोगी कंपन्यांतील भागीदारी विकली आहे. फेब्रुवारीत वाधवान यांनी स्वस्त घरांसाठी कर्ज देणारी कंपनी एएचएफएलमधील त्यांची ७०% भागीदारी ब्लॅकस्टोनला विकली. डीएचएफएलची आधार हाउसिंगमधील ९.१५% भागीदारीही विकली आहे. इतरही विक्रीसाठी बोलणी सुरू आहे.

 

‘दिवाळखोरीत जाणार नाहीच’
डीएचएफएलचे अध्यक्ष कपिल वाधवान यांनी सांगितले की, कंपनी दिवाळखोरीत जाणार नाही. संकटातून बाहेर पडण्यासाठी कर्जदात्यांनी आम्हाला कर्जाचे आश्वासन दिले आहे. कंपनीच्या अनेक बिझनेसमध्ये त्यांची भागीदारी आहे. कंपनी ७ दिवसांच्या आत एनसीडीची थकबाकी देईल. कंपनीने सप्टेंबर २०१८ मध्ये आलेल्या संकटानंतर आतापर्यंत ३५,००० कोटी रुपये थकबाकी भरली आहे.

बातम्या आणखी आहेत...