चोपडा तालुक्यातील मंगरूळ फाट्याजवळ भीषण अपघात, यावल तालुक्यातील एकाचा जागीच मृत्यू


या विचित्र अपघातात तीन जण जखमी झाले आहेत
 

प्रतिनिधी

Apr 07,2019 06:06:00 PM IST

यावल- तालुक्यातील वढोदे येथील माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल विठ्ठल सोनवणे हे मंगरूळ (ता. चोपडा) फाट्याजवळ झालेल्या अपघातात जागीच ठार झाले आहेत. अपघात रविवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडला. ते ज्या चारचाकी वाहनातून जात होते, यावेळी त्यांच्या गाडीसमोर अचानक दुचाकीस्वार आला आणि त्याला वाचवताना गाडी झाडाला आदळली तर मागुन दुसरा दुचाकी धारक थेट चारचाकीवर धडकत विचित्र अपघात घडला. या विचित्र अपघातात तीन जण जखमी झाले आहेत.

वढोदे येथील रहिवासी अनिल विठ्ठल सोनवणे(41) हे चोपडा तालुक्यातील कोळंबे येथे त्यांच्या मोठ्या भावाच्या मुलीस सासरहून आणण्यासाठी गेले होते. तिला घेवुन क्रुझर क्रमांक एम. एच. 19 ए.पी. 4956 ने रविवारी चोपड्याकडून यावलकडे परतत असताना, मंगरूळ (ता.चोपडा) या फाट्याजवळ अचानक दुचाकी धारक वेगाने समोर आल्याने त्याला वाचवण्याचा बेतात वाहन थेट झाडावर धडकले. त्यात क्रुझरच्या मागुन देखील एक दुचाकी धारक वेगाने येत होता तो देखील चारचाकीवर मागुन धडकला त्यात अनिल सोनवणे हे जागीचं ठार झाले. तर दुचाकी धारकासोबतच प्रभाकर शालिक सोनवणे(40) आणि सुमनबाई लिलाधर सोनवणे(50) (रा. वढोदे ता. यावल) हे जखमी झाले आहेत.

या अपघाताची माहिती मिळताच जिल्हा परिषदचे गटनेता प्रभाकर सोनवणे, संदिप सोनवणे आदी अपघातस्थळी दाखल झाले व जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. मयत सोनवणे यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, एक मुलगा असा परिवार आहे. चोपडा येथे कुटीर रूग्णालयात शवविच्छेदन करून त्यांच्यावर रात्री वढोदे येथे अंतसंस्कार केले जाणार आहे या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

X
COMMENT