Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | one month-old child was thrown out of running train, incident at Daund Railway Station

दौंडजवळ रेल्वेतून एक महिन्याच्या बालकाला फेकले; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

प्रतिनिधी | Update - Sep 07, 2018, 08:10 AM IST

दौंड रेल्वे स्थानकाच्या आऊटर सिग्नलवर आरपीएफ कर्मचाऱ्याना एक नायलॉन पिशवी आढळून आली.

 • one month-old child was thrown out of running train, incident at Daund Railway Station

  सोलापूर- धावत्या रेल्वेतून अज्ञात व्यक्तीने एक महिन्याच्या बालकाला नायलॉनच्या पिशवीतून फेकल्याची घटना बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली. दौड स्थानकावरील आरपीएफ कॉन्सटेबल रुळावर गस्त घालत असताना त्यांना एका पिशवीत हालचाल होत असल्याचे दिसले. पिशवीत साधरणत: एक महिन्याचे पुरुष जातीचे बाळ होते. त्यांनी तात्काळ बाळाला रेल्वेच्या रुग्णालयात आणले. त्यानंतर पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केले.

  उपचारानंतर गुरुवारी हे बाळ पुण्यातील महिला बाल कल्याण समितीकडे सुपुर्द करण्यात आले. गुरुवारी दौड लोहमार्ग पोलिसांनी बाळाच्या आई वडिलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. स्थानकावरील सीसीटिव्ही तपासण्यात आले. मात्र, यात काहीही हाती लागले. नाही. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा आणखी फोटो...

Trending