आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • One More Accused Arrested In Inspector Subodh Murder In Bulandshahar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इन्सपेक्टर सुबोध सिंह हत्येतील दुसरा आरोपीही अटकेत, कुऱ्हाडीने डोक्यावर केला होता वार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे झालेल्या हिंसाचारामध्ये इन्सपेक्टर सुबोध सिंहच्या हत्येतील प्रमुख आरोपींपैकी आणखी एकाला मंगळवारी अटक करण्यात आली. कलुआ असे या आरोपीचे नाव आहे. बुलंदशहरमधील एका अत्यंत दुर्गम भागातील गावात तो लपला होता. पोलिसांनी टीप मिळताच पोलिसांनी त्याला त्याठिकाणाहून अटक केली. कलुआने इन्सपेक्टर सिंहच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केला होता असा आरोप आहे. 


कलुआला ताब्यात घेतल्यानंतर पोलिस त्याची चौकशी करत आहे. इन्सपेक्टर सुबोध यांच्या डोक्यावर कलुआने कुऱ्हाडीने वार केला होता. त्यानंतर दुसरी आरोपी प्रशांत नट याने सुबोध यांना गोळी घातली होती. त्याला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. 


रिव्हॉल्व्हर चोरी करणाऱ्याचीही ओळख पटली 
दरम्यान, या घटनेत इन्सपेक्टर सुबोध सिंह यांची रिव्हॉल्व्हर चोरणाऱ्याविषयीही माहिती मिळाली असल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या मते, जॉनी नावाच्या व्यक्तीने सुबोध यांची बंदूक चोरली होती. पोलिसांना मिळालेल्या व्हिडिओत प्रशांत नट आणि हा व्यक्ती एकत्र दिसत आहेत.