आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजून एका भाजपा कार्यकर्त्याची गोळी मारून हत्या, 3 दिवसांत दुसरी घटना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता- उत्तर 24 परगना जिल्ह्यात अज्ञातांनी रविवारी रात्री भाजप कार्यकर्ते चंदन शॉ यांची गोळी मारून हत्या केली आहे. या घटनेनंर परिसरात पोलिसांनी मोठी तुकडी तैणात करण्यात आली आहे. 24 मे रोजी नादिया जिल्ह्यात शुक्रवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी गोळी मारून भाजप कार्यकर्ते संतू घोष यांची हत्या केली आहे. 25 वर्षीय संतू काही दिवसांपूर्वीच तृणमूल काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये सामील झाले होते.

 

लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर बैरकपूर मतदारसंघातील अनेक ठिकाणी हिंसा भडकली. धमाक्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपला 18 आणि तृणमूल काँग्रेसला 22 जागा मिळाल्या आहेत.


बंगाल-त्रिपुरामध्ये हिंसा
लोकसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगाल आणि त्रिपुरामध्ये हिंसा भडकली. यावेळी दोन भाजप कार्यकर्त्यांनी हत्या करण्यात आली. या दोन्ही राज्यात या हिंसाचारादरम्यान 150 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव कुमार देव म्हणाले की, निवडणुकीनंतर हिंसा घडवण्याचा प्रकार वाम दलाने आणला आहे, पण आम्ही त्यांना चेतावनी देतो की, जर कायदा हातात घेतला तर त्यांना माफ केले जाणार नाही.


तृणमूलला त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ- भाजप प्रदेशाध्यक्ष
पश्चिम बंगालमध्ये भाजप प्रदेश अध्यक्ष दिलीप घोषने तृणमूल कार्यकर्त्यांवर हिंसा करण्याचा आरोप लावला आहे. ते म्हणाले की, तृणमूलचे गुंडे विरोधी पक्षांचे नेते आणि उमेदवारांवर हल्ले करत आहेत. ममता बनर्जींचा पक्ष पराभव स्विकारत नाहीये. त्यांनी निकालाला मोठ्या मनाने स्विकार करावा. जर तृणमूलने आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला, तर आम्हीही त्यांना याच भाषेत उत्तर द्यायला समर्थ आहोत.