आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 'One Nation, One Ration Card' Scheme Will Start In The Whole Country From June 1 Next Year

1 जून 2020 पासून देशभरात लागू होई 'एक देश, एक राशन कार्ड', कोणत्याही राज्यातून राशन खरेदी करता येईल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • योजना राबवण्यासाठी देशातील सर्व सरकारी राशन दुकानात पीओएस मशीन लावली जाईल

नवी दिल्ली- केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान म्हणाले की, पुढच्या वर्षी 1 जूनपासून 'एक देश, एक राशन कार्ड' योजना देशभरात लागू होईल. पासवान यांनी मंगळवारी लोकसभेत प्रश्नोत्तरादरम्यान, ही माहिती दिली. ते म्हणाले की, सध्या राशन कार्डसाठी 14 राज्यांमध्ये पीओएस मशीनची सुविधा सुरू करण्यात आली आहे. लवकरच याला देशातील सर्व राज्यात लागू केले जाईल. आतापर्यंत ज्या वॉर्ड किंवा पंचायतमधील राशन कार्ड असेल, त्याच परिसरातीतल सरकारी राशनच्या दुकानात राशन मिळत होते.
 

वन नेशन-वन राशन कार्ड स्कीमचे फायदे
 
या योजनेमुळे सामान्य नागरिकांना भरपूर फायदा होणार आहे. यानंतर आता लोक पीडीएस दुकानाशी बांधिल राहणार नाहीत आणि कधीही त्यांना राशन मिळू शकेल. दुकानावर अवलंबुन राहण्याची गरज नसेल आणि भ्रष्टाचारही कमी होईल. पासवान यांनी सांगितल्यानुसार, या योजनेचा फायदा त्या लोकांना होईल, जे कामानिमित्त इतर राज्यात राहतात. आता त्यांना कोणत्याही राज्यातील राशन दुकानावरुन राशन मिळेल.

या राज्यात लागू आहे आयएमपीडीएस
 
इंटीग्रेटिड मॅनेजमेंट ऑफ पीडीएस(आयएमपीडीएस) अंतर्गत अनेक राज्यात खाद्य आणि सार्वजनिक वितरणाअंतर्गत लाभार्थी कोणत्याही जिल्ह्यातून राशन खरेदी करू शकतील. यात आंध्र प्रदेश, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, केरल, महाराष्ट्र, राजस्थान, तेलंगाना आणि त्रिपुरा सामील आहेत. 

बातम्या आणखी आहेत...