आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका नूरजहां आंब्याची किंमत 500 रूपये, झाडावरून काढण्यापूर्वीच होते बुकींग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदुर(मध्यप्रदेश)- आपल्या वजनदार फळांमुळे "आंब्याची मालकीन" या नावाने ओळखली जाणारी "नूरजहां"ची झाडे मागील वर्षी इल्लियोच्या भीषण उद्रेकामुळे उद्धवस्त झाली. पण आंब्यांच्या शौकीनांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण या आंब्याच्या उरलेल्या झाडांना आंबे येण्यास सुरुवात झाली आहे. अफगानिस्तानची प्रजाती असलेली नूरजहांचे काही उरले-सुरली झाडे मध्यप्रदेशच्या अलीराजपूर जिल्ह्यातील कट्ठीवाडा परिसरात आढळली जातात. नूरजहांची आंबे जवळजवळ 1 फुटापर्यंत मोठी होतात. याच्या कोईचे वजनच 150 ते 200 ग्राम भरते. आंब्याचे शौकीन हे आंबे झाडाला असतानाच याची बुकिंक करतात. मागणी वाढल्यावर याच्या एका आंब्याची किंमत 500 रूपयांपर्यंत होते.

 

इंदुरपासून 250 किलोमीटर दूर कट्ठीवाडामध्ये या प्रजातिची शेतीचे विशेषज्ञ इशाक मंसूरी यांनी सांगितले की, "यावेळी मान्सुन चांगले राहिल्याने नूरजहांच्या झाडांवर बहार फुलला आहे. त्यामुळे चांगला माल येऊ शकतो. या झाडांवर जानेवारीमध्ये तौर येणे सुरू झालो होते, आणि जूनच्या शेवटापर्यंत यावर आंबे येतील. यावेळी याच्या एका अंब्याचे वजन 2.5 किलोपर्यंत राहण्याचा अंदाज आहे." पण ही गोष्ट चकित करणारी आहे, कारण एकेकाळी याच अंब्याचे सरासरी वजन 3.5 ते 4 किलो असयाचे. जानकारांनी सांगितले की, मागील 1 दशकांपासून वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे या आंब्याचे वजन कमी होत आहे.