आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दानवेंची केंद्रात वर्णी, महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी 'या' नेत्यांची नावे चर्चेत...!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- नरेंद्र मोदी आज दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात कोणत्या नेत्याला जागा मिळणार याची सगळीकडेच चर्चा आहे. काही मंत्र्यांना नव्या जबाबदारीसह पुन्हा आणले जाणार आहे, तर काहींना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. तसेच यावेळस काही नव्या चेहऱ्यांना मंत्रीमंडळात जागा दिली जाणार आहे. त्यातच मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे नाव जवळपास निश्चित आहे. रावसाहेब दानवे यांचा 2014 मध्येही मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश होता. मात्र त्यांना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षाची धुरा दिल्याने त्यावेळी मंत्रिपद सोडावे लागले होते.


यावेळी पुन्हा दानवेंचे नाव मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात निश्चित झाल्याने, भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. भाजपकडून प्रामुख्याने चार नावे या शर्यतीत आहेत. यात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे-पालवे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा समावेश आहे.


गिरीश महाजन यांची कारकीर्द पाहता त्यांचे नाव आघाडीवर आहे. संघटन बांधणी असो किंवा अन्य पक्षांची तडजोड, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांमध्ये त्यांनी बजावलेली भूमिका पाहता महाजन यांचं नाव आघाडीवर आहे. दुसरीकडे सुभाष देशमुख हे मराठा समाजाचा चेहरा आणि भाजपमधील ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष मंत्रिमंडळात समावेश न करता त्यांना भाजप प्रदेशाध्यक्ष पद दिले जाऊ शकते.