आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुऱ्हाडीने एकाचा खून, तिघे जण जखमी: 11 जणांवर गुन्हा दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भूम - तालुक्यातील वाकवड येथे  जनावरे चारण्याच्या वादावरून एकाचा कुऱ्हाडीने घाव घालून खून करण्यात आला. तर तिघे गंभीर जखमी झाले. गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.  या प्रकरणी तीन महिलांस ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
वाकवड शिवारातील मासाळ व येळे कुटुंबातील नागरिकांमध्ये गेल्या १५ दिवसांपूर्वी जनावरे चरवल्याच्या कारणावरून मोठा वाद झाला होता. त्यावरून गुरुवारी रात्री लहू मासाळ याला एकट्याला गाठून येळे कुटुंबातील तीन महिलांसह ११ जणांनी बेदम मारहाण केली.

 

हा प्रकार समजताच मनोज मासाळ, त्याचा भाऊ राहुल व अप्पाराव विठ्ठल मासाळ घटनास्थळी पोहोचले. तेव्हा अप्पाराव यांच्या डोक्यात दगड घालण्यात आला.  तर याच दरम्यान दुचाकीवरून मनोज व राहुल तेथे आले. विक्रम येळे याने मनोजच्या डोक्यात मागून कुऱ्हाडीचा घाव घातला. घाव जोराने असल्याने मनोज तेथेच कोसळला.  अन्य लोक राहुलला मारू लागले. अप्पाराव घाबरून रांगत  जात असताना त्यांच्या कंबरेत दगड  डोक्यात काठीने मारहाण केली. त्याचवेळी अन्य मासाळ कुटुंबातील सदस्य तेथे आले. तेव्हा  येळे कुटुंबीय पळून गेले. मासाळ कुटुंबातील इतर सदस्यांनी चौघांनाही रुग्णालयात नेले असता मनोज यांना मृत घोषित करण्यात आले.  तिघांवर उपचार सुरू करण्यात आले.  

 

दरम्यान मनोजचे शवविच्छेदन उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. सर्व आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मनोजचा मृतदेह ताब्यात न घेण्याचा पावित्रा नातेवाइकांनी घेतल्याने रुग्णालयात तणावाचे वातावरण  होते. 

बातम्या आणखी आहेत...