• Home
  • Business
  • One plus tv with 8 speakers and 50w sound to launch in India First

One Plus TV / India First: भारतात लाँच होत आहे 8 स्पीकर्ससह One Plus TV, जाणून घ्या फीचर्स...

आधी भारतात मग इतर देशांत लाँच होणार One Plus चा पहिला TV

Sep 03,2019 05:55:00 PM IST

गॅजेट डेस्क - अॅपल आयफोन आणि सॅमसंगसारख्या कंपन्यांना टक्कर देणारी चिनी कंपनी वन प्लस आता टीव्ही मार्केटमध्ये उतरणार आहे. याच महिन्यात वनप्लसचा टीव्ही लाँच होणार आहे. परंतु, या लाँचिंगपूर्वीच टीव्हीचे फीचर्स एकानंतर एक समोर येत आहेत. नुकतेच समोर आलेल्या माहितीनुसार, या टीव्हीमध्ये 50 वॉटचे एकूण 8 स्पीकर लावले आहेत. हे डॉल्बी अॅटमॉस आणि सराउंड साउंडवर काम करणार आहे. आतापर्यंत बाजारात उपलब्ध असलेल्या बहुतांश टीव्हींमध्ये 18 ते 20 वॉटचे स्पीकर दिले जातात. मीडिया रिपोर्टनुसार, हा टीव्ही याच महिन्याच्या 26 तारखेला लाँच होऊ शकतो.


काही दिवसांपूर्वीच कंपनीने ट्विट करून आपल्या आगामी टीव्हीचे लाँचिंग कन्फर्म केले होते. यात हा नवीन टीव्ही 55 इंच QLED डिस्प्लेसह येणार आहे. 4K रेजोल्यूशन क्वांटम डॉट आणि QLED डिस्प्ले बाजार उपलब्ध असलेल्या OLED टीव्ही पॅनलच्या तुलनेत स्वस्त असतात. कंपनी आपला पहिला टीव्ही अॅमेझॉन या अॅप आणि वेबसाइटवरून विकणार अशी चर्चा आहे. काहींच्या मते, हा टीव्ही 43 इंच ते 75 इंच पर्यंतच्या वेग-वेगळ्या स्क्रीन ऑप्शनसह लाँच होऊ शकतो.


गुगल अॅसिस्टंट, बिल्ट इन क्रोमकास्टसह गुगल प्ले...
कंपनीने जारी केलेल्या माहितीनुसार, हा टीव्ही अॅण्ड्रॉएड डिव्हाइससारखा काम करणार आहे. यामध्ये गुगल अॅसिस्टंट, बिल्ट-इन क्रोमकास्ट आणि गुगल प्ले असा फीचर्स मिळतील. या टीव्हीमध्ये यूजरचा टीव्ही पाहण्याचा अनुभव नेहमीसाठी बदलेल असा दावा कंपनीकडून केला जात आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे, हा टीव्ही सर्वप्रथम भारतीय बाजारात लाँच केला जाणार आहे. यानंतर तो नॉर्थ अमेरिका, युरोप आणि चीनमध्ये लाँच केला जाईल. कंपनी टीव्ही लाँचिंगच्या इव्हेंटमध्ये नवीन स्मार्टफोन देखील लाँच करणार अशी चर्चा आहे.

X