Home | National | Other State | One sided lover kills married woman after rejection in MP

एकतर्फी प्रेमात भाडेकरू विवाहितेवर माथेफिरुचा हल्ला; प्रायव्हेट पार्टमध्ये चाकू, अंगभर दिल्या असंख्य जखमा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 11, 2019, 12:02 AM IST

20 दिवसांपूर्वीच तिने आपल्या पतीसह ती कॉलनी सोडली होती.

  • One sided lover kills married woman after rejection in MP

    इंदूर - येथील स्कीम क्रमांक 78 कॉलनीत राहणाऱ्या 25 वर्षीय विवाहितेचा निर्घृण खून करण्यात आला आहे. तिच्या अंगावर सर्वच ठिकाणी गंभीर जखमा होत्या. खूनीने तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये सुद्धा चाकूने वार केले होते. पीडित महिला आपल्या पतीसह भाड्याच्या घरात राहत होती. त्याच दरम्यान कॉलनीत राहणारा एक युवक तिच्या मागे लागला होता. एकतर्फी प्रेमात त्याने कित्येकवेळा या महिलेची छेड काढली. यानंतर बुधवारी संध्याकाळी तिची निर्घृण हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिशय गंभीर अवस्थेत तिला रुगणालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, काही मिनिटातच असह्य वेदनांनी तिने अखेरचा श्वास घेतला.


    मृत्यूपूर्वी सांगून गेली आरोपीचे नाव
    वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, पाडित महिला काजल आपल्या मृत्यूपूर्वी निखिल आपला मारेकरी असल्याचे सांगितले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून तो काजलचा पाठलाग करत होता. 20 दिवसांपूर्वीच काजल आरोपी निखिलची कॉलोनी सोडून दुसऱ्या ठिकाणी राहण्यासाठी गेली होती. पण, आरोपी तेथे देखील पोहोचला. घटनेच्या दिवशी 7.30 वाजता काजल पाणी भरत होती. त्याचवेळी निखिल घरात अचानक चाकू घेऊन पोहोचला. सुरुवातीला त्याने काजलवर आपले व्यक्त केले. कित्येक दिवसांपासून आपण एकतर्फी प्रेमात आहोत असे त्याने सांगितले. पण, काजलने पूर्वीप्रमाणेच त्याला धुडकावले आणि दोघांमध्ये वाद झाला. यानंतर आरोपीने आपल्यासोबत आणलेला चाकू काढला आणि तिच्यावर असंख्य वार केले. नराधमाने यानंतर चाकू तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये खुपसला. काजलला मरणासन्न अवस्थेत सोडून तो पसार झाला.

Trending