आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • One State Reserve Team Member Suspended Due To Sending Bad Message To Woman, Order Issued By SRPF Coordinators

महिलेस अश्लील संदेश पाठवणारा राखीव दलाचा जवान निलंबित, एसआरपीएफ समादेशकांनी काढले आदेश

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

हिंगोली : हिंगोली येथील राज्य राखीव दलातील एक महिलेस अश्लील संदेश पाठवणारा जवान सचिन मायंदळे या जवानाविरुध्द हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सोमवारी (ता.२३) त्याला निलंबित करण्यात आले आहे. त्याच्या निलंबनाचे आदेश राखीव दलाचे समावेश मंचक इप्पर यांनी काढले आहेत.


येथील राज्य राखीव दलामध्ये बँण्ड पथकात कार्यरत असलेल्या सचिन मायंदळे (३६) हा मागील काही दिवसांपासून राखीव दलातीलच एका जवानाच्या कुटुंबीयास अश्लील संदेेश पाठवत होता. त्या महिलेचा पती कर्तव्यावर बाहेरगावी असल्यामुळे ती महिला शांत होती. त्याचा गैरफायदा घेत त्याने महिलेस संदेश पाठवणे सुरूच ठेवले. त्या महिलेचा पती कर्तव्यावरून आल्यानंतर तिने सदर प्रकार त्यांच्या कानावर घातला. त्यानंतर त्या महिलेने हिंगोली शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी जवान सचिन मायंदळे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला होता. पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या पथकाने तातडीने त्यास अटक केली आहे. रविवारी (ता.२२) त्यास न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची दोन दिवस पोलिस कोठडीत रवानगी केली. या संदर्भातील अहवाल पोलिस निरीक्षक घोरबांड यांनी राज्य राखीव दलाकडे सादर केला. त्यानंतर साेमवारी जवान सचिन मायंदळे याच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले आहेत.