आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेत घुसून अज्ञाताची लहान विद्यार्थ्यांना मारहाण, म्हणाला - 'अभ्यास करा नाहीतर पुन्हा येईन'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अजिंठा : गुरुवार सकाळी ११ वाजता तीस ते पस्तीस वयोगटातील एक अनोळखी व्यक्ती तोंडाला रुमाल बांधून अजिंठा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत घुसला. तो शिक्षिका नसलेल्या वर्गातच घुसला. वर्ग खाेलीला मधून कडी लावत पहिली व तिसरीच्या वर्गातील मुलींना रजिस्टर व काठीने सपासप मारायला सुरुवात केली. "पढाई अच्छे से करो.. मै कल फिर आऊंगा, और तुमको उठा के ले जाऊंगा", असे हिंदी भाषेत बोलून निघून गेला. चिमुकल्यांना वाटलं हा नवीन शिक्षक असेल. साडेअकरा वाजता मधली सुटी झाली तेव्हा त्यांनी शाळेत उपस्थित असलेल्या शिक्षिकेकडे धाव घेत वरील प्रकार सांगितला. हळूहळू ही बाब गावात पसरली. पालकांनी शाळेत भेट देत मुलीच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. याबाबत अजिंठ्याचे सहायक पोलिस निरीक्षक किरण आहेर यांना विचारले असता, आमच्याकडे तर काही तक्रार आली नाही. पण शाळेत बीट जमादार कर्मचारी पाठवून लगेच माहिती घेतो. असे दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.

अजिंठ्याच्या केंद्रीय जि. प. शाळोत चार वर्गांसाठी एकच शिक्षिका आहेत. दरम्यान, गुरुवारी वर्ग पहिली ते चौथीसाठी चार शिक्षिकांपैकी एक सहा महिन्यांच्या रजेवर तर दोन शिक्षिका ट्रेनिंगला गेल्या होत्या. यामुळे चार वर्गांसाठी तेली मॅडम या एकच शिक्षिका शिकवण्यासाठी होत्या.

उसने छडी से मारा... 

"हमारी स्कूल में एक रुमाल मुंह पे बांधकर आदमी आया आकर क्लास काे अंदरसे कडी लगाकर हमे रजिस्टर और छडीसे मारने लगा. अच्छेसे पढाई कराे नहीताे तुमकाे उठाके ले जाऊंगा, मै कल फिर आऊंगा असे म्हणत निघून गेला." - जोया फिरोज तडवी, वर्ग पहिली.

आम्ही खूपच घाबरलो... 

आमच्या तिसरीच्या वर्गात ही तो अज्ञात माणूस आला. काही सांगण्याच्या आतच हातातील रजिस्टरने डोक्यावर व पाठीवर सगळ्यांना मारायला सुरुवात केली. आम्ही खूप घाबरलो होतो. - स्नेहा गुरुभय्ये, वर्ग तिसरी...

  

बातम्या आणखी आहेत...