Home | Maharashtra | North Maharashtra | Nashik | one thieves injured in bullet firing

चोरीच्या पैशाचे हिस्से करताना तिघांत वाद, एकावर झाडली गाेळी

दिव्य मराठी | Update - Aug 04, 2018, 06:55 AM IST

चोरीच्या पैशाचे हिस्से करताना तीन संशयितांमध्ये वाद होऊन दोघांनी साथीदाराच्या पायावर बंदुकीतून गोळी झाडल्याने तो गंभीर ज

  • one thieves injured in bullet firing

    मनमाड- चोरीच्या पैशाचे हिस्से करताना तीन संशयितांमध्ये वाद होऊन दोघांनी साथीदाराच्या पायावर बंदुकीतून गोळी झाडल्याने तो गंभीर जखमी झाला. शहरातील भगतसिंग मैदान परिसरात घडल्याने खळबळ उडाली. मनमाड व धुळे पोलिसांच्या पथकाने याप्रकरणी धुळ्यात लुटमार करून मनमाडला आलेल्या एका जखमीसह तिघांना ताब्यात घेतले.
    धुळ्यातील एका दूध डेअरीमध्ये शुक्रवारी तीन चोरट्यांनी ३५ हजारांची रक्कम लुटून मनमाडकडे धूम ठोकली.


    माहिती मिळताच धुळे पोलिसांनी नाशिक पोलिसांना घटनेची माहिती दिली. धुळे पोलिसांचे पथक चोरांच्या मागावर होते. दुचाकीने तिघेही मनमाडला दाखल झाले. भगतसिंग मैदान परिसरातील घराच्या गच्चीवर संशयित सागर मरसाळे, विनोद मरसाळे व गुरू भालेराव चोरीच्या मालाची वाटणी करताना त्यांच्यात वाद झाला. सागर व विनोद यांनी गुरूवर बंदुकीतून गोळी झाडली. ही गाेळी गुरूच्या पायात घुसल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर दोघेही फरार झाले. जखमी अवस्थेत गुरूनने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले,तर शुक्रवारी सागर आणि विनाेद यांना अटक केली.

Trending