Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | One thousand tons of garbage stuck In city in 15 days

शहरात १५ दिवसांपासून १ हजार टन कचरा पडून; गणेशोत्सव ३ दिवसांवर

प्रतिनिधी | Update - Sep 10, 2018, 09:53 AM IST

शहराच्या काही भागात कचरा वर्गीकरणासह वॉर्डातच प्रक्रिया केली जाते. परंतु, अनेक वॉर्डांत मोठ्या प्रमाणात कचरा पडून आहे. र

  • One thousand tons of garbage stuck In city in 15 days

    औरंगाबाद- शहराच्या काही भागात कचरा वर्गीकरणासह वॉर्डातच प्रक्रिया केली जाते. परंतु, अनेक वॉर्डांत मोठ्या प्रमाणात कचरा पडून आहे. रविवारी तो उचलण्यात आला नाही. गणेशोत्सव तीन दिवसांवर आला असताना शहराच्या विविध भागात एक हजार टन कचरा पडून आहे. तो दोन दिवसांत हटवण्याच्या सूचना महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिल्या आहेत. दरम्यान, पॅचवर्कची कामे दर्जेदार व्हावी, अशी तंबीही त्यांनी दिली असून दर्जा तपासूनच या कामांची बिले दिली जातील, असे संकेतही त्यांनी दिले आहेत. दोन दिवसांपासून हर्सूल येथील प्रक्रिया केंद्रावर शहरातील कचरा टाकला जात आहे. सुमारे दोनशे टन कचरा येथे टाकण्यात आला आहे. परंतु, शहराच्या विविध भागात १५ दिवसांपासून कचरा पडून आहे. त्याचा जुन्या शहरातील नागरिकांना सर्वाधिक त्रास होत आहे.


    रविवारी सुटी असल्याने चारही प्रक्रिया केेंद्रावर कचरा नेण्याचे काम बंद होते. सोमवारी चारपैकी एका केंद्रावर जरी कचरा टाकण्यास अडचणी आल्या तर शहरात साचलेल्या कचऱ्याचे प्रमाण वाढण्याची चिन्हे आहेत. परिणामी ऐन गणरायाच्या आगमनाच्या काळात शहरातील रस्ते कचरामय असण्याची भीती आहे. ही शक्यता पाहता कचरा शहराबाहेर नेण्याचे नियोजन करण्याचे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले आहेत.


    विरोध मावळला
    चारही प्रक्रिया केंद्रावर कचरा नेला जात असून नागरिकांचा विरोध मावळल्यामुळे वाहतूक सुरळीत सुरू आहे. हर्सूल भागातही रहिवाशांचे सहकार्य मिळत आहे. दोन दिवसांत येथे तिन्ही प्रकारचे यंत्र बसवले जाईल, अशी माहिती घनकचरा विभागातील सूत्रांनी दिली.

Trending