आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडील शहीद झाले हे मुलीला 1 वर्षानंतरही माहिती नाही, म्हणते- \'पापा घरी आल्यावर त्यांना कधीच जाऊ देणार नाही\'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क, श्रीनगर. जोहरा ही आठ वर्षांची आहे. तिचे वडील देशासाठी शहीद झाले, परंतू मुलीला अजूनही आशा आहे की, ते एक दिवस नक्की घरी येतील. तिचे वडील या जगात नाहीत, हे मुलीला माहिती नाही. घरच्यांनी तिला सांगितले आहे की, ते हज यात्रेला गेले आहेत आणि लवकरच घरी परत येतील. घरच्यांचे बोलणे ऐकूण जोहरा म्हणते की, आता पापा घरी आल्यावर मी पुन्हा त्यांना जाऊ देणार नाही. एक वर्षांपुर्वी 28 ऑगस्ट 2017 रोजी जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात आतंकवाद्यांनी हल्का केला. यामध्ये सहाय्यक उपनिरीक्षक रशीद शाह शहिद झाले.

 

जोहराचा फोटो झाला होता व्हायरल 
रशीद शाह यांची मोठी मुलगी बिल्किस म्हणते की, जोहराच्या चेह-यावर हास्य आणण्यासाठी मी आणि माझी आई नसीमा अनेक प्रयत्न करतो. जोहरा आपल्या मोठ्या बहिणीला म्हणते की, यावेळी ती पापाला परत जाऊ देणार नाही. 2017 मध्ये जोहराचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये ती वडिलांच्या अंत्यसंस्कारात रडत होती. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले होते की, 'मी एएसआय अब्दुल रशीद यांच्या मुलीचा फोटो पाहिला, तिच्या रडतानाचा फोटो पाहिला, मनातून त्या वेदना निघत नाहीये.'


व्हायरल फोटोसोबत होता हा मॅसेज 
या फोटोसोबत दक्षिण कश्मीरचे डीआयजी राहिलेले एसपी पाणिने एक मॅसेज लिहिला होता. डीआयजीने लिहिले होते की, माझी प्रिय जोहरा, तुझे अश्रू आमच्या मनापर्यंत पोहोचले आहेत. तुझ्या वडिलांनी दिलेले बलिदान नेहमीच लक्षात राहिल. असे का झाले हे समजुन घेण्यासाठी तु खुप लहान आहेस. अशा प्रकारची हिंसा करणारे आणि राज्याच्या प्रतिकांवर अटॅक करणारे लोक पागल आहेत, ते माणुसकीचे शत्रू आहेत.'

 

बातम्या आणखी आहेत...