आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनयभंग करणाऱ्यास एक वर्ष सक्तमजुरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा आरोपी शेख शकील शेख लाल (३५, रा. गारखेडा) याला एक वर्ष सक्तमजुरी व अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी मंगळवारी (२७ नोव्हेंबर) ठोठावली. 
या प्रकरणी १७ वर्षीय पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली होती. फिर्यादी पान विक्रीचा व्यवसाय करते. १५ एप्रिल २०१५ रोजी दुपारी बाराला फिर्यादी घरी आली असता घराचे गेट उघडे दिसले व दाराला बाहेरून कडी दिसली. त्यामुळे मुलीला आवाज देत जिन्यावरून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी निघाल्या असता मुलगी खाली ओरडत येताना दिसली. तिला ओरडण्याचे कारण विचारले असता 'साफसफाई करताना घरात कोणी नसल्याचे पाहून आरोपी शेख शकील घरात घुसला आणि माझा हात ओढू लागला. त्यामुळे मी त्याला झटका देऊन खाली आले' असे मुलीने सांगितले. आई व मुलीचा आरडाओरडा ऐकून आसपासच्या लोकांनी धाव घेऊन आरोपीला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस उपनिरीक्षक एम. बी. लाड यांनी प्रकरणाचा तपास करून कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यावेळी सहायक सरकारी वकील शरद बांगर यांनी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदवले. यामध्ये पीडित मुलीचा जबाब महत्त्वाचा ठरला. दरम्यान, या घटनेवेळी महापालिकेच्या निवडणुका सुरू होत्या व पीडित मुलीच्या घरासमोर कार्यकर्ते प्रचारासाठी जमले होते. मुलगी व तिची आई म्हणजेच फिर्यादीचा आरडाओरडा ऐकून प्रचारासाठी आलेला कार्यकर्ता विक्रांत गडवे याने घरात धाव घेऊन आरोपीला पकडण्यासाठी मदत केली होती. त्यामुळे प्रत्यक्षदर्शी गडवे याची साक्ष प्रकरणात महत्त्वाची ठरली होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद व साक्ष-पुराव्यांवरून कोर्टाने आरोपीला सहा महिने सक्तमजुरी व पाचशे रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली. 
  

बातम्या आणखी आहेत...