आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 वर्षाची मुलगी जाणार तुरूंगात, या कारणांमुळे वडील, आजोबा, आज्जी आहेत तूरूंगात...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पानीपत- ही घटना अशा एका मुलीची आहे जिला तिचे बालपन आता जेलमध्ये घालवावे लागेल. तिची चुकी इतकीच आहे की, ती जेव्हा 6 महिन्यांची होती तेव्हा तिची आई या जगातुन निघुण गेली, तिच्या आईची हुंड्यामुळे हत्त्या करण्यात आली. तिच्या आईला तिचे वडील, आज्जी आणि आजोबाने मिळून मारले होते. सध्या ते तुरूंगात असून त्यांना जामीन मिळत नाहीये.

त्यामुळे मुलगी घरातत एकटीच होती, तिला पाळणारे कोणीच नव्हते. त्यामुळे 6 महिने तिला अनाथालयात राहावे लागले. आता तिच्या आज्जीच्या याचिकेनंतर कोर्टाने त्या मुलीला तिच्या आज्जीसोबत करनाल जेलमध्ये राहण्याची परवानगी दिली आहे. बुधवारी बाल कल्याण समिती आणि पोलिस मुलीला घेऊन करनालला जातील.


आईच्या मृत्युने एकटी पडली मुलगी
सोनीपतच्या मुरथलच्या एका महिलेचे डिसेंबर 2015 मध्ये छाजू गढ़ीच्या एका युवकासोबत लग्न झाले. लग्नानंतर तिने एका मुलीला जन्म दिला. 8 मे 2018 ला तिच्या आईचा संशयास्पद मृत्यु झाला. महिलेच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली की, हूंड्यासाठी तिचा नवरा, सासरा आणि सासूने तिला बळजबरी विष पाजले. पोलिसांनी तिघांना अटक केले, नंतर कोर्टाने त्यांना तुरूंगात टाकले. या घटनेनंतर तिच्या आईच्या वडिलांनीही मुलीचा सांभाळ करण्यास नकार दिला. त्यानंतर बाल कल्याण समितीने त्या मुलीला अनाथालयात टाकले.


केयर टेकरलाच समजते आई
समितीची सदस्य किरण मलिक व सरोज आट्टाने सांगितले की, जेव्हा मुलगी त्यांच्याकडे आली तेव्हा ती 6 महिन्यांची होती. 9 जुलैला केअरसाठी तिला कैथल शिशु गृहात पाठवले. तिथे केअर टेकरने तिला पाळले, आता तिलाच ती मुलगी आई समजते. 


उच्च न्यायलयाच्या आदेशावरून मुलीला आज्जीकडे पाठवण्यात येईल
सदस्य किरण मलिकने सांगितले की, मुलीची आज्जी करनाल तरूंगात बंद आहे. तिने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती की, मुलीला तिच्याकडे पाठवण्यात यावे त्यानुसार मुलीला करनाल तरूंगात तिच्या आज्जीकडे पाठण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...