आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • OnePlus 7T Pro ; Starting Price Rs 54 Thousand, Snapdragon 855+ Processor, Will Go On Sale From October 11

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लेटेस्ट स्नॅपड्रॅगन 855+ प्रोसेसर असलेला ​​​​​​​वनप्लस 7T प्रो लॉन्च, इतकी आहे किंमत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क : चीनची कंपनी वनप्लसने गुरुवारी आपल्या लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन वनप्लस 7T प्रो  भारतीय बाजारामध्ये लॉन्च केला. कंपनीने हा स्मार्टफोन 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजच्या सिंगल व्हॅरिएंटमध्ये लॉन्च केले आहे. याची किंमत 53,999 रुपये आहे. फोनमध्ये पॉप-अप कॅमेरा आणि एज-टू-एज डिस्प्ले पाहायला मिळाला. गेमिंग आणि मल्टी टास्किंगसाठी फोनमध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 855+ प्रोसेसर दिले गेले आहे. हे ऑक्सीजन ओएस बेस्ड अँड्रॉइड 10 ओएसवर काम करते. याचसोबत कंपनीने 58,999 रुपये किमतीचा वनप्लस 7T प्रो मॅकलॉरेन एडिशनदेखील लॉन्च केला आहे. 

ब्लू कलरच्या सिंगल कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध... 


भारतातीतल किंमत आणि ऑफर.
.. 

- कंपनीने वनप्लस 7T प्रो चा 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजचा सिंगल व्हॅरियंट लॉन्च केला आहे. याची किंमत 53,999 रुपये आहे. 
- फोनचा पहिला सेल 11 ऑक्टोबर 12 वाजेपासून सुरु होईल. जे विशेषतः देशातील 8 मोठ्या शहरांमध्ये वनप्लस स्टोअरवरून खरेदी केले जाऊ शकेल. 
- 12 ऑक्टोबर रात्री 12 वाजेपासून हा ओपन सेल विक्रीसाठी उपलब्ध होईल. हा अॅमेझॉन आणि वनप्लस रिटेल चॅनलवरून खरेदी केला जाऊ शकेल. 
- वनप्लस 7T प्रो केवळ ब्लू कलरच्या सिंगल कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. 
- अॅमेझॉनवरून फोन HDFC बँक क्रेडिट/डेबिट कार्डने खरेदी केल्यावर 3 हजार रुपयांचे इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. 
- ICICI बँक क्रेडिट/डेबिट कार्डने वनप्लस 7T प्रो केल्यावर 1750 रुपयांचे डिस्काउंट मिळेल. 
- अॅमेझॉनवर खरेदी केल्यावर 6 महिने नो-कॉस्ट ईएमआय, फ्लाइट बुकिंग केल्यावर 3 हजार रुपयांपर्यंतची सूट मिळेल. 

फोनमध्ये काय आहेत वैशिष्ठ्ये... 
- हा वनप्लस 7 प्रो चा अपडेट व्हर्जन म्हणून लॉन्च केला गेला आहे. पॉप-अप सेल्फी कॅमेरा, कर्व्ड एज एमोलेड डिस्प्ले, डायमेंशन आणि वजनाच्या बाबतीत  वनप्लस 7T प्रो आणि वनप्लस 7 प्रो एकसारखाच आहे. 
- फोन ऑक्सीजन ओएस 10.0 वर बेस्ड अँड्रॉइड 10 वर रन करतो. ज्यामुळे फोनमध्ये पोर्ट्रेट मोड, मॅक्रो मोड आणि रीडिंग मोड यांसारखे फीचर्स मिळतात. 
- वनप्लस 7T प्रोमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा मोड्यूल आहे. यामध्ये 48 मेगापिक्सलचा सोनी IMX586 सेंसरने लेस प्राइमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा आणि 16 मेगापिक्सलचा 117 डिग्री व्ह्यू असलेला अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा आहे. 
- रियर कॅमेऱ्यामध्ये अल्ट्राशॉट, नाइटस्केप, पोर्ट्रेट, प्रो मोड, पॅनोरमा, एचडीआर, एआय सीन डिटेक्शन आणि रॉ इमेज यांसारखे फीचर मिळतात. 
- फोनमध्ये सोनी IMX471 सेंसलपेक्षा लेस 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराचे. यामध्ये प्री-लोडेड फेस अनलॉक, एचडीआर, स्क्रीन फ्लॅश आणि फेस रीटचिंग यांसारखे फीचर मिळतात. 

वनप्लस 7T प्रोचे बेसिक स्पेसिफिकेशन... 
डिस्प्ले साइज - 6.67 इंच
डिस्प्ले टाइप - QHD+, 1440x3120 पिक्सल रिझोल्युशन, फ्लूइड एमोलेड डिस्प्ले विद 90Hz रिफ्रेश्ड रेट, 3D कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन
ओएस - ऑक्सीजन ओएस 10.0 बेस्ड अँड्रॉइड 10
प्रोसेसर - ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 855+ प्रोसेसर विद अँड्रीनो - 640 जीपीयू
रॅम - 8 जीबी
स्टोरेज - 256 जीबी
रियर कॅमेरा - 48MP(सोनी IMX586 प्रायमरी सेंसर विद OIS आणि EIS सपोर्ट)+ 8MP (टेलीफोटो लेंस विद OIS सपोर्ट)+16MP (117 डिग्री अल्ट्रा-वाइड-अँगल)
फ्रंट कॅमेरा - 16MP(सोनी IMX471 सेंसर)
कनेक्टिव्हिटी - 4जी, वाय-फाय 802.11, ब्लूटूथ 5.0, जीपीएस, एनएफसी, यूएसबी टाइप-सी पोर्ट
बॅटरी - 4085mAh विद 30T फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी सपोर्ट
डायमेन्शन - 162.6x75.9x8.8 एमएम
वजन - 206 ग्राम