Home | Business | Gadget | OnePlus customer won a whopping 600 gifts

ख्रिसमसच्या आधीच OnePlus कंपनी बनली सांता क्लॉज, आपल्या पहिल्या भाग्यवान विजेत्याला दिल्या 600 शानदार भेटवस्तू

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 08, 2018, 12:37 PM IST

80,000 ते 1,00,000 रूपयांपर्यंत आहे भेटवस्तूंची किंमत

 • OnePlus customer won a whopping 600 gifts

  गॅझेट डेस्क - एखाद्या विजेत्याला एकाचवेळी 600 भेटवस्तू भेटल्याचे आपण कधी ऐकले आहे का? दरवेळेस काही नवीन करून युवकांच्या मनावर राज्य करणारी प्रीमियम स्मार्टफोन कंपनी OnePlus आणखी एक नवीन उपक्रम राबवला आहे. कंपनीने आपल्या पहिल्या 'वनप्लस लकी स्टार' ला 600 भेटवस्तू दिल्या आहेत.


  > अग्रेसर प्रीमियम स्मार्टफोन कंपनी OnePlus आणि Amazon.in यांच्या भारतातील एक्सक्लूसिव्ह पार्टनरशिपला चार वर्ष पूर्ण झाल्याचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे. या तीन दिवसीय उत्सवातदरम्यान OnePlus 6T च्या मागणीमध्ये तीन पटीने वाढ झाली आहे. या तीन दिवसीय उत्सवातदरम्यान वनप्लस लकी स्टार मोहीमेची सुरूवात करण्यात आली होती. या वेगळ्या अभियानाचे विजेत्याला एकाचवेळी 600 भेटवस्तू देण्यात येणार होते. या भेटवस्तूंमध्ये इलेक्ट्रॉनिक आणि हाउसहोल्ड उपकरणांसोबत गेमिंग आणि स्पोर्ट्सशी निगडीत सामग्री होती.

  > OnePlus ने आपल्या पहिल्या वनप्लस लकी स्टारच्या नावाची घोषणा केली आहे. दिल्ली येथील 24 वर्षीय शशांक शेखरला 600 एक्सक्लूसिव्ह भेटवस्तूंची लॉटरी लागली आहे. वनप्लस इंडियाचे जनरल मॅनेजर विकास अग्रवाल यांनी शशांकच्या घरी जाऊन ह्या भेटवस्तू दिल्या आहेत. या भेटवस्तूंची किंमत 80,000 ते 1,00,000 रूपयांपर्यंत आहे आणि यामध्ये 35 वेगवेगळ्या श्रेणींचा समावेश आहे. यामध्ये लॅपटॉप, गेमिंग कन्सोल, फर्नीचर, म्यूझीकल इन्स्ट्रुमेंट्स, स्पोर्टचे सामान. किचन आणि होम आयटम्स यांचा समावेश आहे. सोबतच फॅशन आणि स्टेशनरी आयटम्स देखील आहे.

  > अॅमेझॉन इंडियाचे कॅटेगिरी मॅनेजर मनीण तिवारी यांचे म्हणणे आहे की, वर्धापन दिनाच्या ऑफर दरम्यान OnePlus 6T च्या मागणीत तीन पटीने वाढ झाली आहे. आमच्या वनप्लस लकी स्टार 600 भेटवस्तू मिळाल्यानंतर खुश असल्याचे पाहून आम्हाला आनंद झाला आहे. आम्ही OnePlus सोबत आणखी अधिक उत्साहपूर्ण प्रवासाची आशा करत आहोत.

  या वेळी वनप्लस इंडिया चे जनरल मॅनेजर विकास अग्रवाल यांनी सांगितले की, Amazon.in सोबतची आमची भागीदारी ग्राहकांच्या उत्साहामुळे सुरू केली होती. या भागीदारीला चार वर्ष पूर्ण झाल्यामुळे आम्ही आनंदी आहोत. सोबतच आम्हाला या उंचीवर पोहोचवणाऱ्या ग्राहकांची परतफेड करण्यायोग्य झालो आहोत. मी शंशाकला त्याच्या विजयाबद्दल शुभेच्छा देत आहे. आज 600 भेटवस्तू देण्याचा माझ्यासाठी वेगळाच अनुभव होता.

  > भागिदारीच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने वनप्लस लकी स्टार मोहीमेची घोषणा करण्यात आली होती. OnePlus 6T च्या मागणीत तीन पटीने वाढ झाली आहे. प्रीमियम सेगमेंटमध्ये या फोनला युवकांची पहिली आवड बनला आहे.

 • OnePlus customer won a whopping 600 gifts
 • OnePlus customer won a whopping 600 gifts

Trending