आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Smartphone सेगमेंटमध्ये धूम करणाऱ्या \'वनप्लस\' ची आता स्मार्ट टीव्ही मार्केटमध्ये उडी; लवकरच बाजारात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क - प्रीमिअम स्मार्टफोन्स सेगमेंटमध्ये सॅमसंगसह आयफोनला टक्कर देणारी कंपनी वन प्लस लवकरच टीव्ही लाँच करणार आहे. वन प्लस स्मार्टफोनप्रमाणेच त्यांचा टीव्ही सुद्धा बाजारात आपली वेगळी छाप सोडेल असा कंपनीचा दावा आहे. वनप्लसचे सीईओ पीट लॉ यांनी नुकतीच एका ब्लॉग पोस्टमध्ये या क्रांतिकारी निर्णयाची घोषणा केली आहे. पुढच्या वर्षी हा टीव्ही ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला जाईल अशी शक्यता आहे.

 

व्हीयू, एमआय टीव्हीला आव्हान

तज्ञांच्या मते, भारतीय बाजारपेठेनुसार त्याची किंमत स्वस्त असेल आणि त्याची वैशिष्ट्ये इतर कोणत्याही टीव्हीपेक्षा त्याला वेगळे बनवतील. अर्थातच भारतात सध्या उपलब्ध असलेल्या स्वस्त परंतु, दर्जेदार स्मार्ट टीव्ही VU आणि MI टीव्हीला हा ब्रँड जोरदार टक्कर देणार आहे. पीट लॉ यांनी सांगितल्याप्रमाणे, नवीन शैलीत पारमपारिक टीव्ही सादर करण्याचा हा प्रयत्न आहे. हा फक्त टीव्ही नसणार तर 'टोटल कनेक्टेड यूझर एक्सपिरिअन्स' युक्त गॅजेट असणार आहे. हा टीव्ही उच्च दर्जाचे हार्डवेअर आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे एक संमिश्र रूप असेल असा त्यांचा दावा आहे.

 

अद्याप वनप्लसने आपल्या बहुप्रतीक्षित स्मार्ट टीव्हीची वैशिष्ट्ये जाहीर केली नाहीत. परंतु असे मानले जाते की यामध्ये 'आर्टिफिशियल इंटेलिजेंस सपोर्ट' देखील असणार आहे. वनप्लसच्या मते, प्रॉडक्ट लॉन्च झाल्यानंतर, स्टेप बाय स्टेप त्यामध्ये अपडेट दिले जातील. जेणेकरुन वापरकर्त्यास अद्याप न मिळू शकलेले अनुभव मिळू शकतील. वनप्लसच्या मते, त्यांचा नवीन टीव्ही स्मार्टफोनपेक्षाही अधिक स्मार्ट आणि उत्कृष्ट असेल. आपले उत्पादन अधिकरीत्या चांगले व्हावे यासाठी कंपनी ग्राहकांकडून सतत फीडबॅक घेत राहणार आहे.

 

नाव सूचवा, वनप्लसकडून बक्षीस मिळवा...

या वैशिष्ट्यपूर्ण टीव्हीसाठी आपल्या चाहत्यांनीच नाव सूचवावे असे वनप्लस कंपनीला वाटते. यासाठी कंपनी ऑनलाईन स्पर्धा घेत आहे. यामध्ये स्पर्धकाला टीव्हीचे नाव सुचवायचे आहे. अंतिम 10 स्पर्धकांना वनप्लसचे बुलेट्स वायरलेस मिळणार आहेत. तर प्रथम विजेत्यास स्मार्टटीवी मिळणार आहे. सोबतच त्याला उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात येणार आहे. 


खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सुद्धा या स्पर्धेत भाग घेऊ शकता. 

https://forums.oneplus.com/threads/contest-oneplus-tv-you-name-it.907312/

 

बातम्या आणखी आहेत...