आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाईमुळे एक महिन्यात कांद्याचा खप 3 लाख टनांनी कमी

2 वर्षांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

मुंबई/नाशिक : देशात सध्या कांद्याचे मोठे संकट आहे. त्याचे मुख्य कारण महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात यांसारख्या मोठ्या कांदा उत्पादक राज्यांत झालेला अवकाळी पाऊस. यंदा सुमारे ५० ते ६० टक्के कांदा उत्पादन क्षेत्रात पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात कांदा ६० ते १५० रुपये प्रतिकिलो या दराने विकला जात आहे. देशात ऑक्टोबर २०१८ मध्ये १०.९५ लाख टन कांदा विक्री झाली होती. या वर्षी ऑक्टोबर २०१९ मध्ये ८.०१ लाख टन कांदा विक्री झाली. अशा प्रकारे आपण एक महिन्यात या वर्षी ऑक्टोबरमध्ये २.९४ लाख टन कमी कांदा खरेदी केला आहे किंवा खाल्ला आहे. कांद्याचा खप कमी होण्याचे एक कारण म्हणजे झालेली दरवाढ. कांद्याची आवक कमी झाल्याचा परिणाम खपावरही झाला आहे. कृषितज्ज्ञ देवेंद्र शर्मा म्हणाले की, सरकारच्या गैरव्यवस्थापनामुळे दरवाढ होत आहे. सरकारकडे कोणतीच योजना नाही. त्यामुळे सध्याची वेळ आलेली आहे.

कांदा का रडवतोय? आधी हवामानाचा फटका आणि नंतर सरकारच्या दिरंगाईमुळे आयातीला झालेला विलंब

1. कांदा यंदा महाग का आहे?
 
लासलगाव एपीएमसीचे संचालक जयदत्त होळकर म्हणाले, या वर्षी मार्च-एप्रिलमध्ये जास्त उष्णतेमुळे उत्पादन कमी झाले. नंतर जास्त पाऊस झाला. मान्सून दीर्घ काळ चालला. पेरणी दीड महिना उशिरा झाली.

2. टंचाईचा निर्यातीशी संबंध आहे का?
 
कांदा उत्पादक राज्यांत पाऊस झाल्याने पीक खराब होण्याची शक्यता असूनही जूनमध्ये १,५९,६१४ क्विंटल, जुलैत १,६०,६४५ आणि ऑगस्टमध्ये १,२६,७२२ क्विंटल कांदा निर्यात झाली. सप्टेंबरमध्ये कांदा निर्यातीवर बंदी लागेपर्यंत ४२३ कोटी रुपयांचा कांदा विदेशात पाठवण्यात आला होता.

3. आयातीचा निर्णय उशिरा झाला का?
 
अॅग्रिकल्चर मार्केट एक्स्पर्ट विजय सरदाना म्हणाले की, केंद्राने २० नोव्हेंबरला १.२ लाख टन कांदा आयातीचा निर्णय घेतला आहे. दर कमी असताना आयातीत कांदा आला असता तर एवढा महाग झाला नसता.

4. किती कांदा विदेशातून मागवला, त्यामुळे दर कमी होतील?
 
जो कांदा विदेशातून मागवला आहे तो आला तर दर नियंत्रित राहतील. केंद्राने एक लाख टन कांदा आयातीचा निर्णय घेतला आहे. तुर्कीहून कांद्याची पहिली खेप मुंबईच्या बंदरात पोहोचलीही आहे. पण दर जास्त वाढले असल्याने सध्या किरकोळ बाजारात दर सामान्य होण्यास वेळ लागेल.

5. नवे पीक कधी येईल? त्याचा दरावर काय परिणाम होईल?
 
कांद्याचे नवे पीक या महिन्याच्या मध्यापासून येण्यास सुरुवात होईल. विदेशातून येणारा कांदाही या महिन्यात येईल. त्यामुळे कांद्याचे दर नवीन वर्षात सामान्य होतील.

6. विदेशातून कांदा कोण मागवत आहे? सरकार की खासगी व्यापारी?
 
विदेशातून कांदा एमएमटीसी ही सरकारी कंपनी मागवत आहे.

7. कांदा महाग मिळत असेल तर शेतकऱ्यांना किती पैसा मिळत आहेत?
 
दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना मिळत नाही. फक्त एक ते दोन टक्के शेतकरीच फायदा घेण्याच्या स्थितीत आहे.

8. शेतकऱ्यांना फायदा मिळत नाही तर खरा फायदा कोणाला होत आहे?
 
कांदा दरवाढीचा फायदा मोठे व्यापारी, दलाल आणि मूठभर श्रीमंत शेतकऱ्यांनाच होत आहे.

9. कांदा उत्पादक राज्यांत सर्वात मोठ्या राज्यांत किती कांदा झाला?
 
२०१८-१९ नुसार कांदा उत्पादक प्रमुख मोठी पाच राज्ये अशी : १. महाराष्ट्र (८०.४७ लाख टन), २. मध्य प्रदेश (३७.१५ लाख टन), ३. कर्नाटक (२६.४६ लाख टन), ४. बिहार (१४.०३ लाख टन), ५. राजस्थान (१३.८८ लाख टन)

आपण किती खरेदी केला कांदा?

वर्ष सरासरी रिटेल दर सरासरी ठोक दर शेतकऱ्यांना प्राप्त दर
2013 33.33 2,805 2,345
2014 23.17 1,816 1,692
2015 31.902,6452,421
2016 16.791,272832
2017 22.411,7351,364
2018 23.641,8441,234
2019 26.082,0851,341

स्रोत :- (रिटेल दर प्रतिकिलोत, ठोक आणि शेतकऱ्यांना मिळालेला सरासरी दर क्विंटलमध्ये) सरासरी रिटेल दर आणि सरासरी ठोक दर केंद्रीय ग्राहक कल्याण, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयानुसार. शेतकऱ्यांना मिळालेला सरासरी दर केंद्रीय कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागानुसार.
 

बातम्या आणखी आहेत...