आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांदे उत्पादकांनी मुख्यमंत्र्यांच्या वाहनांवर भिरकावले शाईचे फुगे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बुधवारी साक्रीत अालेल्या मुख्यमंत्र्यांच्या वाहनांच्या ताफ्यावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी काळ्या शाईचे फुगे भिरकावले. मात्र काळ्या शाईचे फुगे वाहनाच्या शेजारी पडले. तसेच काही शेतकऱ्यांनी कांदेही भिरकावले. पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य विचारात घेत कासारे येथील एकाला ताब्यात घेतले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बुधवारी जिल्ह्यात आले होते. सकाळी नेर येथील सभा आटोपल्यानंतर ते शिरपूरला रवाना झाले होते. सायंकाळी साक्री शहरात सभा झाली. तिथे हेलिपॅडवरून सभास्थळी जात असताना कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. तसेच हातात असलेल्या काळ्या शाईचे फुगे मुख्यमंत्र्यांच्या वाहनांवर भिरकावले. मात्र, हा फुगा वाहनाच्या शेजारी पडला. शिवाय अन्य दोघांनी कांदे भिरकावले. या प्रकरणी पोलिसांनी धीरज देसले नामक व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.