महागाई / कांदा-बटाट्याचे भाव वाढले, जानेवारीत ठोक महागाईत वृद्धी, नऊ महिन्यांत उच्च स्तर

  • खाद्यपदार्थांमध्ये भाज्यांच्या किमती ५२.७२% वाढल्या
  • जानेवारीत ठोक महागाई दर ३.१%, एप्रिल १९ मध्ये ३.२४ % होता

वृत्तसंस्था

Feb 15,2020 09:43:00 AM IST

नवी दिल्ली - घाऊक किमतीवर आधारित महागाईचा दर जानेवारीत वाढून ३.१ % नाेंद झाली आहे. गेल्या नऊ महिन्यांतील ही सर्वात उच्चतम पातळी आहे. गेल्या वर्षात एप्रिलमध्ये ३.२४ % नाेंद झाली हाेतिी. तर डिसेंबर २०१९ मध्ये २.५९ % आणि गेल्या वर्षीच्या जानेवारीमध्ये २.७६ टक्के हाेती. बटाटा, कांदा यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढल्यामुळे घाऊक महागाईचा दर वाढला आहे.


वाणिज्य आणि उद्याेग मंत्रालयाने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून ही माहिती समाेर आली आहे. त्यानुसार जानेवारीत खाद्येतर वस्तूंच्या किमती मासिक आधारावर वाढून डिसेंबरच्या २.३२ % वरून जवळपास तीन पटीने वाढून ७.८ टक्के झाल्या आहेत. खाद्यपदार्थांच्या गटात भाज्यांच्या किमतीत ५२.७२ % वाढ झाली. त्यामध्ये कांद्याचा जास्त वाटा हाेता. याच कालावधीत कांद्याच्या किमतीमध्ये २९३ % वाढ झाली, तर बटाट्याच्या किमतीमध्ये ३७.३४ % वाढ झाली आहे.


जानेवारीत किरकाेळ महागाईचा दर ७.५९ % वर :

या आठवड्याच्या सुरुवातीला जानेवारीत किरकाेळ महागाईची आकडेवारी जाहीर झाली हाेती. ती ७.५९ टक्के नाेंद झाली असून गेल्या सहा वर्षांतील ही उच्चांकी पातळी आहे. भाज्या आणि खाद्यपदार्थांच्या किमतीतील वाढ हे यामागे मुख्य कारण आहे. मे २०१४ मध्ये ती ८.३३ % हाेेती. रिझर्व्ह बँक नाणेनिधी धाेरण ठरवताना महागाईच्या आकडेवारीची नाेंद घेते. मध्यवर्ती बँकेने ६ फेब्रुवारी राेजी आपल्या नाणेनिधी धाेरणामध्ये प्रमुख व्याजदरात काेणताही बदल केला नाही. रेपाे दर ५.१५ % जैसे थे ठेवला. साेबतच नाणेनिधीबाबत अॅकाेमाेडेटिव्ह धाेरण ठेवले. पुढील नाणेनिधी धाेरण ३१ मार्च, एक एप्रिल व तीन एप्रिल राेजी जाहीर करेल.

X
COMMENT