आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Onion Prices In Increase In Varanasi, People Have Expressed Anger At The Biggest Market

वाराणसीत दरवाढीविरुद्ध केेेली कांद्याची आरती, सर्वात मोठ्या बाजारात लोकांनी व्यक्त केला रोष

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
कांदा दरवाढीविरोधात वाराणसीतील मोठ्या बाजारात कांद्याची पूजा करत नागरिकांनी अनोखे आंदोलन केले. - Divya Marathi
कांदा दरवाढीविरोधात वाराणसीतील मोठ्या बाजारात कांद्याची पूजा करत नागरिकांनी अनोखे आंदोलन केले.

वाराणसी - कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्य लोक हैराण झाले आहेत. कांदा दरवाढीविरोधात देशभर आंदोलन होत आहे. उत्तर प्रदेशातील वाराणसीतही कांदा दरवाढीविरोधात लोकांनी अनोखे आंदोलन केले. येथील सर्वात मोठा बाजार विशेश्वरगंजमध्ये कांद्याची कापराने आरती करण्यात आली.सामाजिक संस्था सुबह-ए-बनारस क्लबच्या वतीने आयोजित या आंदोलनात मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. या वेळी मार्गदर्शन करताना संस्थेचे अध्यक्ष मुकेश जायस्वाल यांनी सांगितले की, कांद्याचे भाव आकाशाला भिडले आहेत. १०५ ते ११० रुपये दराने कांदा विकला जात आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या ताटातून कांदा गायब झाला आहे. कांद्यामुळे स्वयंपाकघराचे बजेट कोलमडले आहे. या महागाईला दलाल जबाबदार असून सरकारने अशा लोकांवर कडक कारवाई करायला हवी, अशी मागणी जायस्वाल यांनी केली. जिल्हा प्रशासनाने कमी दरात कांदा विक्री करावी, अशीही मागणी त्यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...