आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Onion Prices Increased By 700% In One Year, While Potato Prices Increased By 25%

एका वर्षात कांद्याचे भाव ७०० % वाढले, बटाट्याच्या किमतीत २५ टक्क्यांची वाढ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बटाटे आणि कांद्याच्या वाढत्या भावाने आणले अडचणीत, अन्य भाज्यांचे भावही अस्थिर

नवी दिल्ली- कांद्याच्या गगनाला भिडलेल्या दरामुळे सर्व सामान्य लोक त्रस्त आहेत. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात देशातील विविध शहरांत १० ते ३० रुपये प्रति किलो विकला जाणाऱ्या कांद्याचा किरकोळ भाव या डिसेंबर महिन्यात ७० ते १२० रु. प्रति किलोपर्यंत पाेहोचले आहेत. याशिवाय बटाटाही गेल्या वर्षी या महिन्याच्या तुलनेत २५% महाग आहे. दिलासादायक बाब म्हणजे, अन्य भाज्यांचे दर नियंत्रणात आहेत.देशातील बहुतांश शहरांत बटाटा २० ते ३० रुपये प्रति किलोने विकत आहे. गेल्या वर्षी या अवधीत बटाट्याचे दर १० ते २० रुपये प्रति किलो होते. मध्य प्रदेशात या वेळी टोमॅटो गेल्या वर्षीच्या तुलनेत महाग आहे. गेल्या वर्षी या राज्यात टोमॅटोचे मोठे पीक आले होते हे त्यामागचे कारण आहे. या वेळी टोमॅटोचे दर देशातील अन्य शहरांप्रमाणेच आहेत. तज्ज्ञांनुसार, कांद्याचे पीक हातचे जात असल्याचे आधीच कळाले होते. मात्र, सरकारने निर्यात रोखली नाही. परिणामी कांद्याचे भाव वाढले.

या पद्धतीने मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार आदी राज्यांत बटाट्याच्या पीकाचे पावसामुळे नुकसान झाले. त्यामुळे या वेळी बटाट्याच्या किमतीत ५ ते १० रु.प्रति किलोपर्यंत वाढल्याचे दिसले. असे असले तरी, टोमॅटो व मिरची पिकाला जास्त फटका बसला नाही. छत्तीसगडच्या डुमरतराई श्रीराम ठोक भाजी विक्रेता समितीचे अध्यक्ष टी. श्रीनिवास रेड्डी म्हणाले, स्थानिक मंडईत कांदा, बटाटा, गाजर व मटारची आवक बाहेरूनच होत आहे. मात्र, बहुतांश भाज्यांची आवक स्थानिक आहे व त्यांचे भावही कमी आहेत. येत्या एक-दोन आठवड्यात स्थानिक आवक आणखी वाढेल व भाव कोसळण्याची शक्यता आहे. 

लसूण दर तीन महिन्यांपासून कमी नाही-

यंदाच्या पावसामुळे लसणाचे पीक धोक्यात आले. परिणामी सप्टेंबरपासूनच लसणाच्या भावात घट होताना दिसत नाही. भोपाळमध्ये लसणाचा भाव २०० रुपये प्रति किलोवर स्थिर आहे. गेल्या वर्षी हा भाव ५० ते ६० रुपये किलो होता. जयपूर, इंदूरसह अन्य शहरांमध्येही हीच स्थिती दिसून येते.

बातम्या आणखी आहेत...